शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा

By नारायण जाधव | Updated: November 13, 2023 15:03 IST

आठ विभाग कार्यालयांच्या अखात्यारीत स्वच्छता मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सारा देश दिवाळी आपल्या घरादारांच्या स्वच्छतेस प्राधान्य देत असताना स्वच्छ शहरांच्या यादीत प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईकरांनी लक्ष्मी पूजनाच्या रात्री खाद्यपदार्थांसह फटाके आणि फुलांचा तब्बल २७ टन ७०० किलो कचरा करून आपल्या असंवेदनशिलतेचे दर्शन घडविले. तर शहरवासीयांनी केलेला हा कचरा नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आठ विभागीय कार्यालयांच्या अखात्यारीत विशेष पथकांद्वारे साफ करून आपल्या कार्यतत्परेतेच दर्शन घडविले.

दिवाळी म्हटले की, सर्व जण आपली घरे, दारे, कार्यालये, दुकाने स्वच्छ करतात. दिवाळीच्या आधीच ही स्वच्छतो माेहीम सुरू असते. परंतु, वसुबारसपासून सुरू असलेला दिवाळसण खऱ्या अर्थाने साजरा होतो लक्ष्मीपूजनानंतर. यादिवशी प्रत्येक घरात, कार्यालयात, दुकानदारांकडून विधीवत पुजाअर्चा केली जाते. फुलांची आरास केली जाते. तोरणे बांधली जातात. नंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, हे करताना अनेक जण उरलेली फुले, तोरणांचा कचरा आणि अंगणात, परिसरात फोडलेल्या फटाक्यांचा कचरा तसाच ठेवतात.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ३७५ सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक केली होती. १० रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने आणि १३ मिनी टिपर वाहने यांच्या माध्यमातून या स्वच्छता मोहीमेत गोळा केलेला प्रामुख्याने फटाक्यांच्या कच-यासह इतर कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहून नेला. स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या कार्यवाहीवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व ठिकाणी भेटी देत बारकाईने लक्ष ठेवून होते.

शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर पहाटे १ ते ५ या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खाद्यपदार्थ यांचा ९ टन ६०० किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके, कागद, पुठ्ठे, कापड यांचा १८ टन १०० किलो सुका कचरा गोळा करून एकूण २७ टन ७०० किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला. यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईतील रस्ते सकाळी स्वच्छ दिसत होते, अशी माहिती राजळे यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका