शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

५० पैसेखालील आणेवारीत एकाही गावाचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:47 IST

पालघर जिल्ह्यामध्ये पैसेवारी जाहीर : ३२ गावे पीक पैसेवारीविना

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर हा आदिवासीबहुल कृषिप्रधान जिल्हा असून जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावांत ५० पैसेखालील आणेवारी नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली  आहे.     पालघर तालुक्यात एकूण गावांची संख्या २२४ असून खरीप गावांची संख्या २१४ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या २१४ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या १०  आहे.  डहाणू तालुक्यात एकूण गावांची संख्या १८३ असून खरीप गावांची संख्या १८१ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १८१ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे. वाडा तालुक्यात एकूण गावांची संख्या १७२ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १७० आहे. अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे.     विक्रमगड तालुक्यात गावांची संख्या ९४ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या ९४ आहे. जव्हार तालुक्यात गावांची संख्या १०९ असून या सर्वच गावांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे. मोखाडा तालुक्यातील सर्वच ५९ गावांची पैसेवारी जाहीर झालेली आहे. तलासरी तालुक्यातही सर्वच ४२ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

पालघर जिल्ह्यातील एकूण ३२ गावांमध्ये भातपीक नसल्यामुळे पीक पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात देलवाडी, अकरपट्टी, दांडी, नवापूर, आशेरी, नवी दापचारी, खारमेद्री, खारवडश्री, नवी अकरपट्टी, नवी पोफरण, डहाणू, मल्याण, वर्धा, शिळ, समेळ, सोपारा, निळेमोरे, तुळींज, नवघर, कराडी, तरखड, आक्तन, नायगाव, चोबारे, किरवली, पाली, निर्मळ, विरार, मनवेलपाडा, आचोळे, वालीव, सातिवली, आगाशी, धोवली या गावांचा यामध्ये समावेश आहे. 

वसईतील पैसेवारी वसई तालुक्यात गावांची संख्या १२५ इतकी असून खरीप गावांची संख्या १०५ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १०५ इतकी असून अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या २० आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई