शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

बुडालेल्या जहाजातून वाचलेले तरूण कुवेतमधील तुरूंगात अडकले: ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका

By नामदेव मोरे | Updated: March 1, 2024 19:31 IST

नाशिकच्या तरूणांची शोकांतीका

नवी मुंबई : नाशिकमधील दोन तरूण डिसेंबर २०२३ मध्ये नोकरीसाठी इराणमधील जहाजावर गेले होते. कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने ते दोघे वाचले पण तेथील तुरूंगात अडकले. ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तरूणांची सुटका झाली असून १ मार्चला ते सुखरूप मुंबईत परतले आहेत.

अविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरूणांची नावे आहेत. या दोघांना एक एजंटने सेल्फ ईमायग्रेशनच्या माध्यमातून इराणला पाठविले होते. तेथील जहाजावर नोकरी करत असताना १९ जानेवारीला कुवेतच्या किनाऱ्यावर त्यांचे जहाज बुडाले. जहाजावरील इतर सहकारी बुडाले परंतु अविष्कार व निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरूप किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. कुवेतमधील अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले व उपचारानंतर त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले. जहाज बुडाल्यामुळे पासपोर्ट व इतर कागदपत्रेही हरविली होती. शेतकरी कुटुंबातील या तरूणांना सोडविण्याचे आव्हान कुटुंबियांसमोर उभे राहिले होते. ऑल इंडिया सिफेरर्स यूनियनने यापुर्वी अशाप्रकारे विदेशात अडकलेल्या तरूणांची सुटका केल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी युनीयनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनी कुवेतमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून दोन्ही तरूणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.

भारतीय दुतावास व परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अखेर या दोन्ही तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यात व त्यांना सुखरूप भारतामध्ये आणण्यात यश आले आहे. १ मार्चला दोन्ही तरूण मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सिफेरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

एजंटकडून होते फसवणूकनोकरीची गरज असलेल्या तरूणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये पाठविले जाते. या व्यवसायात अनेक बोगस दलालही सक्रीय झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरूणांची कागदपत्र काढून घेतली जातात. अनेक तरूण तेथे अडकत असून अशा प्रकारे तरूणांना गुलामगीरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही सिफेरर्स यूनियनने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

एक महिन्यापासून कुवेतमध्ये अडकलो होतो. ऑल इंडीया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे तेथून सुटका झाली व पुन्हा मायदेशी परत आलो आहोत.अविष्कार जगताप,नाशिक

कुवेतच्या किनाऱ्याजवळ १९ जानेवारीला रात्री आमचे जहाज बुडाले. अनेक सहकारीही बुडाले. आम्ही सुखरूप किनाऱ्यावर पोहचले पण तेथेच अडकलो होतो. सिफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका झालीनिवृत्ती बागुल, नाशिक

नाशिकमधील दोन खलाशी कुवेतमध्ये अडकल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी निदर्शनास आणून दिले. संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांची सुखरूप सुटका करण्यास सहकार्य केले.संजय पवार, अध्यक्ष ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई