शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:17 IST

एनआरआय मधील घटना : सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून ओळख.

नवी मुंबई - सूर्यकांत वाघमारे  लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मैत्रिणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एनआरआय परिसरात घडली. यामध्ये तरुणीचा घटनास्थळी मृतदेह आढळून आला. मात्र खाडीत उडी टाकलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी देखील मिळून आला नाही. 

भाविका मोरे (१९) असे मृत तरुणीचे नाव असून ती सीवूड परिसरात राहणारी आहे. तिची सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून सात्विक पाटील याच्यासोबत ओळख होती. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध आले होते अशीही माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून दोघे वेगळे झाले होते. यावरून त्यांच्यात वाद सुरु होता. त्यातूनच मंगळवारी दोघेही एकमेकांना भेटले होते.

बुधवारी देखील सात्विक याने तिला डीपीएस शाळेच्या मागील निर्मनुष्य ठिकाणी भेटीसाठी बोलवले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला असता सात्विक याने भाविकाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर एका छोट्या नाल्यात तिचा मृतदेह टाकून डोक्यावर लादी टाकली होती. तर भाविकाच्या हत्येनंतर सात्विक याने देखील काही अंतरावरच असलेल्या पुलावरून खाडीत उडी मारली. यावेळी त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या काहींनी त्याला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पाण्याचा दबाव जास्त असल्याने तो वाहून गेला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यानंतर गुरुवारी देखील खाडीलगतच्या भागात त्याचा मृतदेहाचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला असता पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. 

सोशल मीडियाद्वारे भाविका व सात्विक एकमेकांच्या संपर्कात होते. चार महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. बुधवारी दोघे भेटले असता झालेल्या भांडणातून सात्विकने भाविकाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः खाडीत उडी मारली असून त्याचा शोध सुरु आहे.पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी