शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुंबईसह पाच प्रमुख बाजार समित्यांचा अभ्यास, उमाकांत दांगट समितीची कार्यकक्षा वाढविली

By नारायण जाधव | Updated: November 11, 2023 11:16 IST

राज्यात बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचे वारे सुरू असतानाच या पाच प्रमुख बाजार समित्यांचा गुरुवारी दांगट समितीत समावेश केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई : सहकार विभागाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीकडून खासगी बाजाराप्रमाणेच मुंबई एपीएमसीसह पाच बाजार समित्यांचा अभ्यास होणार आहे. या समितीच्या कार्यकक्षेत आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचाही समावेश केला आहे. राज्यात बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचे वारे सुरू असतानाच या पाच प्रमुख बाजार समित्यांचा गुरुवारी दांगट समितीत समावेश केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. व्यापाऱ्यांत स्पर्धा निर्माण होऊन शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सहकार विभागाने थेट पणन आणि खासगी बाजार आवारांसह कंत्राटी शेती आणि इलेक्ट्रॉनिक व्यापाराचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र, एवढे करूनही शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  सहकार विभागाने १३ सप्टेंबर २०२३ रोजी एक समिती स्थापन केली होती. दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीला ७५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या समितीत पणन सचिव, संचालकांसह औरंगाबाद, नाशिक, विदर्भातील शेतकरी प्रतिनिधी, व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. मात्र, या पाच बाजार समित्यांचाही समावेश केल्याने तिला मुदतवाढ मिळू शकते.

खासगी बाजारांमुळे शासनाचे नुकसानराज्यात नाशिक, औरंगाबाद खासगी बाजार आवार स्थापन झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणे लेव्ही भरावी लागते. ती खासगी बाजार आवारातील संचालकांनी वसूल करून शासनाच्या पणन संचालकांकडे जमा करणे अभिप्रेत आहे. अनेक ठिकाणी ती वसूल करून पणन संचालकांकडे जमा न करता शासनाचा महसूल बुडविला जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळेच राज्यातील खासगी बाजार समित्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘या’ बाबींचा अभ्यास राज्यातील खासगी बाजार आवार, शेतकरी ग्राहक बाजार यांना प्रातिनिधिक स्वरुपात भेटी देऊन तेथे सुरू असलेले कामकाज, सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करणे, खुल्या पद्धतीने व स्पर्धात्मक लिलावाद्वारे होते किंवा नाही याची पडताळणी करणे.शेतकऱ्यांना विक्रीपश्चात वेळेत रक्कम मिळते किंवा नाही, कृषी माल खरेदी-विक्रीचे व्यवहार रोखीने न होता डिजिटल पद्धतीने होतात की नाही, याबाबत खात्री करणे.बाजारात सेवा योग्य पुरविल्या जातात का याची पाहणी करून खात्री करणे, बाजार आवारात आगप्रतिबंधक सेवा पुरविली आहे की नाही, याबाबत तपासणी करून अहवाल सादर करणे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती