शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दिवाळीनिमीत्त महानगरपालिकेची विशेष रात्रसफाई मोहीम, २३ टन कचरा केला संकलीत

By नामदेव मोरे | Updated: October 25, 2022 18:34 IST

नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमध्ये देशात तीसरा क्रमांक आला आहे.

नवी मुंबई : दिवाळीनिमीत्त नवी मुंबई महानगरपालिकेने रात्रीची विशेष स्वच्छता मोहीम राबविली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत दिघा ते सीबीडी पर्यंत ३५६ स्वच्छता दूतांनी २३ टन कचरा संकलीत केला. फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा रात्रीमध्येच साफ केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमध्ये देशात तीसरा क्रमांक आला आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणूनही ओळख आहे. शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून लक्ष्मीपुजनाच्या दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फटाक्यांमुळे शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढत असते. इतर कचराही निर्माण हाेत असतो. हा कचरा साफ करण्यासाठी ३५६ स्वच्छता दुतांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना ८ पिकअप वहाने व ८ आरसी वाहने उपब्ध करून दिली होती. सर्व ८ विभागांमधील मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी रात्री ११ पासून कचरा संकलीत करण्यास सुरुवात करण्यात आली. पहाटे ३ पर्यंत हार, फुले असा ८ टन ओला कचरा, कागद, पुट्टे, कापड असा १५ टन सुका कचरा संकलीत करण्यात आला.सकाळी दिवस उजाडण्याच्या अगोदरच सर्व कचरा साफ झाल्याचे पाहून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे यांच्यासह इतर स्वच्छता अधिकारी या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. मनपाच्या उपक्रमाविषयी शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईDiwaliदिवाळी 2022