शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 10, 2023 15:10 IST

घणसोलीत राहणाऱ्या विवाहितेने केली होती आत्महत्या 

नवी मुंबई : माहेरी शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. फेब्रुवारी घणसोलीत हि घटना घडली होती. या विवाहितेच्या मोबाईलमध्ये तिला झालेला अश्लील शिवीगाळ समोर आला आहे. याप्रकरणी तरुणावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घणसोली येथील कौलआळीत राहणाऱ्या पूजा काकडे (ईक्कर) हा विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २२ फेब्रुवारीला घडली होती. दरम्यान तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नव्हते. यापूर्वी तिच्या चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीत वाद सुरु होते. मात्र कुटुंबातील व्यक्तींनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांचा संसार पुन्हा रुळावर आला होता. त्यातच फेब्रुवारी महिन्यात तिने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तिचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये काही अनोळखी नंबरवरून आलेले फोन व मॅसेज समोर आले. त्यामुळे पोलिसांनी मृत पूजाच्या वडिलांना संपर्क साधून रविवारी त्याबाबत खात्री केली. त्यामध्ये पूजाच्या माहेरी हिंजवडी येथे राहणाऱ्या अर्जुन पोळ याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले.

याबाबत पूजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी त्याच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन काही महिन्यांपासून तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन व मॅसेज करून अश्लील शिवीगाळ करत होता. त्याबाबत तिने यापूर्वी वडिलांना सांगितले असता त्यांनी त्याला समज देखील दिली होती. त्यानंतरही तो त्रास देतच राहिल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस