शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत खासगी तरणतलावांचे पेव; पण प्रशासनाचा ना सुरक्षेवर अंकुश, ना शुल्कावर..!!

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 6, 2026 11:55 IST

प्रशिक्षकांचा पोरखेळ, सुरक्षेच्या नियमांना बगल

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शहरातील पंधराहून अधिक खासगी तरणतलाव असून, त्या ठिकाणी शेकडाे लहान मुलांसह प्रौढ व्यक्ती पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र बहुतांश तरणतलावांत प्रावीण्यप्राप्त प्रशिक्षक नाहीत. त्यावर प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याने केवळ नफ्यासाठी हे तरणतलाव सुरू आहेत.

नवी मुंबईतून दोन दशकात अनेक जलतरणपटू घडले.  महापालिकेने जलतरणपटू घडविण्याच्या उद्देशाने वाशीत ऑलिम्पिक दर्जाचे तर घणसोलीत साधारण असे दोन तरणतलाव उभारले. त्याशिवाय महापालिका क्षेत्रात जवळपास १५ खासगी क्लब, संस्थांमार्फत तरणतलाव चालवले जात आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानगी घेणे याशिवाय ना कोणते प्रशासकीय निर्बंध आहेत, ना कोणती नियमावली.तरणतलावात प्रशिक्षणार्थींना विम्याचे ‘सुरक्षा कवच’ पुरवले जात नाही. त्यामुळे पोहताना दुर्घटना घडून जखमी झाल्यास किंवा जीवावर बेतल्यास कोणालाही भरपाई मिळत नाही.

महापालिकेचा जुहूगाव येथे ऑलिम्पिक दर्जाचा ५० मीटर लांबीचा तरणतलाव आहे. गतवर्षापासून तो ठेकेदारामार्फत वापरात आहे. येथे एक हजार रुपये शुल्क आहे. घणसोलीतल्या सेंट्रल पार्कमधील तरणतलाव महापालिका चालवते. येथे वयोगटानुसार ३०० ते ६०० रुपये शुल्क आहे. वाशी, नेरूळ, सीबीडी, ऐरोली येथे खासगी क्लबचे तरणतलाव आहेत. येथे २० दिवसांचे तीन हजार रुपये शुल्क आहे.

अशा घडल्या दुर्घटना

जुहूगाव येथे महापालिकेच्या तरणतलावात गतवर्षी एका तरुणीचा मृत्यू झाला. वाशीतील फादर अग्नल शाळेच्या तरणतलावात एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. घणसोलीतला तरणतलावात वर्षभरातच अनेक तरुण, मुले जखमी झाली आहेत. सुरक्षा रॉड निखळणे, छताचे प्लास्टर कोसळणे, तळाशी असलेल्या फिल्टचे नट ढिले होऊन ते हाता पायाला लागून प्रशिक्षणार्थी रक्तबंबाळ होत आहेत.

महिला प्रशिक्षकांचा अभाव

महापालिकेच्या तरणतलावासह खासगी तरणतलावात बहुतांश मुली, महिलादेखील शिकण्यासाठी येत असतात. प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षक नसल्याने त्यांना अवघडलेपणा येतो. तर काही प्रशिक्षक किंवा तरणतलावाचे कर्मचारी महिलांसोबत गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारीवरून काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंतही गेली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai's private pools boom lacks safety, fee regulation.

Web Summary : Navi Mumbai's private pools thrive, but safety and fees lack regulation. Accidents occur due to absent trainers and poor maintenance, with concerns about female coaching. Municipal pools also face issues.
टॅग्स :SwimmingपोहणेNavi Mumbaiनवी मुंबई