शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत लवकरच पामबीचवर होणार फुलपाखरू उद्यान

By नारायण जाधव | Updated: August 20, 2023 18:28 IST

सारसोळेतील 12 एकर भूखंडाचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याची सुचना : मंदा म्हात्रेंची होती मागणी

नवी मुंबई:नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर असून त्याला उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असून या खाडीत जगप्रसिद्ध अशा फ्लेमिंगो व विविध पक्षाचा तसेच फुलपाखरांचा वावर असतो. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे याची भेट घेऊन नवी मुंबई येथील सारसोळेत पामबीच लगत असलेल्या 12 एकर भूखंडावर फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार शिंदे नगरविकास सचिवाना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

म्हात्रे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) नेमका काय आहे ? तो कसा उभारतात ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात अनेक ठिकाणी तसेच वैयक्तिक असे फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारले गेले आहेत. जसे सिंगापूरच्या धर्तीवर नवी मुंबईत बटरफ्लाय गार्डन बनविल्यास ते एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येईल. तसेच उद्यानातील विविध प्रकारचे रंगबेरंगी फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) पाहण्यसाठी पर्यटकांची संख्याही वाढेल.

या फुलपाखरू उद्यानामुळे नवी मुंबईचा दर्जा ही वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होईल व नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात भर पडून पर्यटनाला चालनाही मिळेल. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत तपासणी करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. नवी मुंबई शहर आधीच फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई