शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गच्चीतील जम्पिंग मशीनमुळे १२ वर्षीय मुलाचा झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 11:56 IST

वाशीतली घटना : उंच उडून थेट कोसळला खाली

नवी मुंबई : टेरेसवर ठेवलेल्या जम्पिंग मशीनवरून उडून १२ वर्षीय मुलगा इमारतीवरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. लॉकडाऊन कालावधीत मुलांच्या खेळण्याची सोय म्हणून हे जम्पिंग मशीन त्या ठिकाणी बसवण्यात आले होते. मात्र हेच मशीन या मुलासाठी जीवघेणे ठरले. 

इशान गुप्ता (१२) असे इमारतीवरून पडून मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो वाशी सेक्टर १७ येथील महाराणी सोसायटी राहणारा असून, एनआरआय येथील खासगी शाळेत शिकत होता. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास तो सात मजली इमारतीच्या छतावर ठेवलेल्या जम्पिंग मशीनवर खेळत होता. यावेळी त्याने जम्पिंग मशीनवर मारलेल्या उडीमुळे तो सुरक्षा भिंतीपेक्षा अधिक उंच वर उडून इमारतीवरून खाली कोसळला. यावेळी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी उपचार सुरु असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

लॉकडाऊन कालावधीत मुलांना सोसायटी आवाराबाहेर जाण्यावर बंधने आल्याने मुलांच्या खेळण्यासाठी ही जम्पिंग मशीन इमारतीच्या टेरेसवर ठेवण्यात आली होती. त्यानुसार मुले खेळताना टेरेसवरील जागेच्या मध्यभागी ती ठेवणे आवश्यक होते. मात्र सोमवारी रात्री हे जम्पिंग मशीन टेरेसच्या सुरक्षा कठड्याला लागूनच ठेवले होते. यामुळे त्यावर इशान हा खेळत असताना तो उंच उडाला जाऊन भिंतीवरून खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान मृत पावल्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद वाशी पोलीस ठाण्यात केली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

इशानचे डोळे दान करण्याचा निर्णय अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी इशानच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरत त्यांनी इशानचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील इशान जग पाहू शकणार आहे. शिवाय दुःखद प्रसंगात देखील कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई