शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल क्षेत्रात बसवणार ९८ लिटल बिन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:27 IST

पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी लिटल बिन्स बसविण्यात येणार आहेत.

कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी लिटल बिन्स बसविण्यात येणार आहेत. आरोग्य सभापती डॉ. अरुण भगत यांच्या हस्ते नुकतेच या कामास सुरुवात झाली असून, आठ दिवसांत निश्चित केलेल्या जागेवर बिन्स बसविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.स्वच्छ सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या पनवेल महापालिका प्रशासनाकडून अभियानांतर्गत जोरदार तयारी सुरू आहे. प्रभागनिहाय स्पर्धा जाहीर झाल्याने नगरसेवकांमध्येही चढाओढ लागली आहे. त्याचबरोबर स्वच्छता मोहीम ठिकठिकाणी सुरू आहे. शहरातील भिंती रंगवून त्यावर स्वच्छता आणि जनजागृतीपर सामाजिक संदेश रेखाटण्यात आलेले आहेत. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गृहसंकुले, हॉटेलमालक, रेस्टॉरंटमध्ये जागृती करण्यात येत आहे. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया सोसायट्यांना कंपोस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेलचा कचराही महापालिकाव सिडकोने उचलणे बंद केलेआहे.रस्त्यावर कचरा दिसू नये, याकरिता कचराकुंडीमुक्त वसाहतींचा संकल्प करण्यात आला आहे, तसेच डोअर टू डोअर जाऊन कचरा संकलन करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. आगामी काळात पनवेल चकाचक तसेच स्वच्छ दिसावे, याकरिता लिटल बिन्स बसविण्यात आले आहेत.या वेळी स्वच्छता विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा वंजारी, आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, शैलेश गायकवाड, भावेश चंदने, कळंबोलीचे अधीक्षक भगवान पाटील, प्रकाश गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.तीनशे लिटल बिन्समहापालिकेत समाविष्ट असलेल्या भागात तीनशे लिटल बिन्स लावण्यात येणार आहेत. त्यापैकी ९८ बिन्स पनवेल शहरात बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर नवीन पनवेल आणि इतर ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे कनिष्ठ अभियंता स्नेहा वंजारी यांनी सांगितले. ओला आणि सुका कचरा टाकण्याकरिता दोन बिन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.चोरी करणे कठीण४० लिटरच्या या बिन्स स्टीलच्या तयार करण्यात आल्या आहेत. एका बिन्सचा खर्च १७ ते १८ हजार रुपये आहे. ते चोरी होऊ नये, याकरिता क्र ाँक्र ीटीकरण करून फिटिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर या बिन्सला स्क्रूही असल्याचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी सांगितले.