शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत दोन दिवसांत हटवल्या ७७६ झोपड्या; महानगरपालिकेची धडक कारवाई

By नामदेव मोरे | Updated: May 28, 2024 19:27 IST

खाडीकिनाऱ्यासह उद्यानाचा भूखंड अतिक्रमणमुक्त

नवी मुंबई - मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीगाव परिसरातील खाडीकिनारा ते महामार्गादरम्यानचे उद्यान व इतर भूखंडांवरील झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत ७७६ झोपड्या हटविण्यात आल्या. या कारवाईदरम्यान कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नवी मुंबईमध्ये सिडको, एमआयडीसी व शासनाच्या माेकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम केले जात आहे. कोट्यवधी रुपयांचे भूखंड झोपड्या उभारून हडप केले जात आहेत. वाशीगाव सेक्टर ३१ परिसरात रेल्वे स्टेशन, सिडको प्रदर्शन केंद्र, देशभरातील अनेक राज्यांचे भवन, आयटी पार्क, मॉल्स असल्यामुळे या परिसरातील भूखंडांना शहरात सर्वाधिक भाव मिळतो. परंतु, मागील काही वर्षांमध्ये या परिसरातील मोकळ्या भूखंडावर सातत्याने झोपड्या उभारल्या जात आहेत. उद्यानासाठी राखीव असलेला भूखंड, खाडीकिनारा ते सायन - पनवेल महामार्गाच्या मध्ये असलेले मोक्याच्या भूखंडांवर शेकडो झोपड्या उभारण्यात आल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या झोपड्यांवर कारवाई करीत सोमवारी दिवसभरात तब्बल ६३८ व मंगळवारी १३८ झोपड्या हटविल्या.

या वर्षातील अनधिकृत झोपड्यांवरील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनधिकृत झोपड्यांविरोधातील ही कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.बेलापूरमध्ये १९३ झोपड्या हटविल्यामागील काही दिवसांपासून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू केली आहे. आठ दिवसांमध्ये बेलापूरमध्ये दोन वेळा कारवाई केली. पहिल्या दिवशी १४५ व दुसऱ्या कारवाईमध्ये ४८ अशा एकूण १९३ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका