शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

७७ ,१९६ हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या उभारण्याच्या कामाला पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:51 IST

जेएनपीएने २०२० पासुन पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात केली आहे.

मधुकर ठाकूर

उरण : जागतिक स्तरावरील सर्वात मोठे आणि जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सुमारे ७७,१९६ हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या कामाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै २०२३ रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.स्थानिक मच्छीमारांच्या जोरदार विरोधानंतरही पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्याने रखडत रखडत सुरू असलेल्या व वर्षाकाठी २ कोटी ३० लाख कंटेनर क्षमतेचे वाढवण मेगा पोर्ट उभारण्याच्या कामाला चालना मिळणार आहे.

 जेएनपीएने २०२० पासुन पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात केली आहे. समुद्रात नैसर्गिक खोली लाभलेल्या या उभारण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची कंटेनर हाताळणीची क्षमता वर्षाकाठी २ कोटी ३० लाख इतकी प्रचंड आहे.७७,१९६ हजार कोटी खर्चाच्या हे मेगा पोर्ट दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे.दोन टप्प्यात हे मेगा पोर्ट उभारण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या विकासकामांसाठी जेएनपीए ४४ हजार कोटी खर्च करणार आहे.तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ३३ हजार कोटी रुपये प्रायव्हेट सेक्टरमधुन खर्च केला जाणार आहे.या एकूण ७७.१९६ हजार कोटी खर्चाच्या कामामध्ये बंदराकडे जाणारे स्वतंत्र रस्ते तयार करणे,ब्रेकवॉटर, ड्रेजिंग, रिक्लेमेशन, भूसंपादन, रेल्वे मार्गाची निर्मिती करणे, वीजपुरवठा व्यवस्था, बंधाऱ्यांची निर्मिती, पाणी पुरवठा,कार्गो बर्थ उभारणी आदी कामांचा समावेश असल्याचे जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.

  जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या वाढवण मेगा पोर्ट उभारण्यास येथील स्थानिक मच्छीमारांचा कडवा विरोध आहे.सीआरझेड ,केंद्रीय मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि पर्यावरण विभागाकडून विविध मंजुरी मिळवण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे  मागील चार वर्षांपासून या वाढवण बंदराचे काम रखडत रखडत सुरू आहे.

  जेएनपीएला डहाणू तालुक्यातील वाढवण येथे या वाढवण बंदराची स्थापना आणि विकास करण्याची ३१ जुलै २०२३ रोजी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने (DTEPA) परवानगी दिली आहे.या परवानगीच्या आधारावर आता केंद सरकारच्या पर्यावरण विभागाकडे विविध प्रकारच्या आवश्यक परवानगीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जेएनपीएने सांगितले.  

डहाणू तालुक्यात वाढवण बंदराची स्थापना आणि विकास करण्यास विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. ७७,१९६ कोटी रुपयांच्या खर्चाच्या व गुंतवणुकीसह उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक बंदरातुन प्रतिवर्षी सुमारे ३०० मिलियन टन कंटेनर मालाची वाहतूक होणार आहे. ३०० मिलियन टन क्षमतेचे वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार आहे.-संजय सेठी,अध्यक्ष - जेएनपीए.