शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे काम न करताच ७३ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:00 IST

चणेरा लघु पाटबंधारे (म्हसेवडी धरण) योजनेतील काम सुरू न होताच तब्बल ७३ लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या धरणासाठी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

पनवेल : चणेरा लघु पाटबंधारे (म्हसेवडी धरण) योजनेतील काम सुरू न होताच तब्बल ७३ लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या धरणासाठी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिल्याची माहिती प्रकाश विचारे यांनी दिली.रोहा तालुक्यातील चणेरा लघु पाटबंधारे योजना २ फेब्रुवारी १९८१ रोजी मंजूर झाली. त्यावेळी तिचा खर्च ५९२.४९ लाख इतका होता. दुसºयांदा योजनेला ९ जून १९९४ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यावेळी त्याचा खर्च २८७०.२६ लाख होता. त्यानंतर २०११ मध्ये तिसºयांदा मान्यता दिली त्यावेळी त्याचा खर्च ३२६३.७७ लाख दाखवण्यात आला आहे. यामध्ये ११२३० मीटर लांबीचे २० मीटर उंचीचे मातीचे धरण बांधवायचे आहे. त्यामध्ये ५१४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहणार आहे. त्याचा २५० हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. माजी पालकमंत्री सुनील तटकरे यांनी काम सुरू करण्यासाठी तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २०११ मध्ये भूमिपूजनही केले. या प्रकल्पावर जानेवारी २०१८ पर्यंत ७३.०९ लाख खर्च झाल्याची माहिती देण्यात आली, पण कामाला अद्याप सुरु वात झाली नाही, असे सांगण्यात आले आहे. धरणाचा कामाचा ठेका एफ. ए. कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. एसीबीच्या तपासात हे धरण सापडल्याने त्याचे काम थांबवण्यात आले आहे.>धरणाचे काम थांबलेएसीबीच्या तपासात हे धरण सापडल्याने त्याचे काम थांबवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर धरणाचे काम दुसºयाला देण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. चणेरेकरांना आणखी काही वर्षे धरणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Damधरण