शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये वर्षभरात आगीच्या ६८२ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:05 IST

शहरातील १,७८० ठिकाणी मदतीसाठी धावले अग्निशमनचे जवान

नवी मुंबई : नवी मुंबईमध्येही आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वर्षभरामध्ये तब्बल ६८२ ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. रेस्क्यू आॅपरेशन, अपघातासह एकूण १,७८० ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी धाव घ्यावी लागली होती. अनेक सरकारी अस्थापनांसह निवासी इमारतींमध्येही अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्याचे निदर्शनास आले आहे.नवी मुंबई सुनियोजित व देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांपैकी एक असल्याची प्रसिद्धी केली जाते; परंतु प्रत्यक्षात येथील नागरिकांमध्येही अग्निशमन नियमांविषयी उदासीनता असल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारती, सरकारी कार्यालये व व्यावसायिक आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. आग लागू नये यासाठी काळजी घेतली जात नसल्याचे अनेक दुर्घटनांच्या नंतर स्पष्ट झाले आहे. यामुळे प्रतिदिन १ ते २ ठिकाणी आग लागत आहे. रेस्क्यू आॅपरेशनसाठीही प्रतिदिन किमान एकतरी कॉल येऊ लागला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरामध्ये अग्निशमन दलाच्या पाच कार्यालयांमध्ये एकूण १,७८० कॉल आले आहेत. यामधील ६११ ठिकाणी आग लागली होती. रेस्क्यू आॅपरेशनसाठी ४५९, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे ४९, इतर ६४४ व अपघातांचे १७ कॉल आले आहेत. पाच कार्यालयांमध्ये मिळून प्रतिदिन जवळपास चार कॉल आल्याचे अग्निशमनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.महापालिका क्षेत्रातील दुर्घटनांच्या घटनांमध्ये रस्ते अपघातांपेक्षा आगीच्या घटनांची संख्या वाढत आहे. आग लागलेल्या बहुतांश ठिकाणी आगनियंत्रण यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येते. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांनी त्यांच्याकडील साठ्याची माहिती प्रवेशद्वारावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात रसायन आहे, याचा तपशील या फलकावर नोंद करणे आवश्यक आहे. सर्व कंपन्यांमध्ये आगनियंत्रण यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे; परंतु अनेक कारखानदार याकडे दुर्लक्ष करतात. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत तेथील अग्निशमन यंत्रणा सुरू असते. त्यानंतर त्याची देखभाल केली जात नसल्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.तुर्भेतील डम्पिंगला आगतुर्भेतील पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याची माहिती वाशी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार दुपारी २:३० च्या सुमारास बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली; परंतु आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. अज्ञाताकडून ही आग लावली गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही त्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.नवी मुंबई क्षेत्रातील आतापर्यंतच्या मोठ्या आगीच्या घटना२४ मार्च २०१२ - कोपरखैरणेमधील जुन्या डम्पिंग ग्राउंडला आग, भंगार वाहनांसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक१९ आॅगस्ट २०१३ - सीबीडी सेक्टर ११ मधील अग्रवाल ट्रेड सेंटरच्या सहाव्या मजल्यावर आग१९ एप्रिल २०१४ - वाशीमधील नवी मुंबई मर्चंट चेंबरच्या ए मार्ट शॉप या दुकानामधये भीषण आग३१ आॅक्टोबर २०१५ - सीवूड इस्टेट इमारतीमधील १५ व्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग२४ मे २०१६ - सीबीडी सेक्टर १५ मधील ब्रिव्ह हाउस कॅफेमध्ये आगनोव्हेंबर २००६ - एमआयडीसीमधील सावला कोल्ड स्टोरेजला भीषण आग२०१८ मधील तपशीलजानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये शहरात आगीच्या ६८२ घटना घडल्या होत्या. ४०१ ठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन, २६ ठिकाणी अत्यावश्यक मदत, ५२५ इतर घटना व ३१ अपघात, अशा वर्षभरात १,६६५ वेळा अग्निशमन जवानांना मदतीसाठी धाव घ्यावी लागल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.