शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

By नारायण जाधव | Updated: March 8, 2024 21:22 IST

निधी उभा करण्याचे मोठे आव्हान : नगरविकासकडून कोणतेही आश्वासन नाह.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यावर अखेर नगरविकास विभागाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. एकेकाळी वाढीव मालमत्ताकराच्या प्रश्नांवर नवी मुंबई महापालिकेतून २००५ पासून बाहेर पडल्याने ती गावे आणि त्यांच्या परिक्षेत्राची बजबजपुरी झाली आहे. यामुळे त्यांना नवी मुंबईच्या स्तरावर आणण्यासाठी विकास आराखड्यानुसार किमान पायाभूत पुरविण्यासाठी ६६०० कोटींची गरज भासणार आहे.या गावांसाठी इतका मोठा निधी कसा उभा करायचा याचे मोठे आव्हान आता महापालिका प्रशासनासमाेर असणार आहे. कारण या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करताना नगरविकास विभागाने महापालिकेस कोणतेही आश्वासन दिलेले नाही. निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत. गावांच्या समावेशाचा पूर्व इतिहास- २००१ मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. यामुळे गावांचा विकास रखडल्याने आमचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. यासाठी आंदोलने, निदर्शने केली होती.- अखेर एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना मार्च २०२२ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. स्थानिकांनी पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या सर्व पक्षीय विकास समितीद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.- यानंतर २०१५ मध्ये ती गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत, असा अशासकीय ठराव मंजूर करण्यात आला. अखेर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. तर, मार्च २०२२ च्या अधिवेशनात नगरविकासमंत्र्यांनी त्यांच्या महापालिकेत समावेशाची घोषणा केली...........महापालिकेने या सुविधा निर्माण केल्या१९९२ मध्ये १४ गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला. त्यानंतर महापालिकेनेही या गावांसाठी नळ योजना, रस्ते अशा काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या. यात नावाळीत माता-बाल रुग्णालयही बांधले होते. या भागातून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले होते...........असा हवा निधी- आता महायुती सरकारने गुरुवारी ही १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय काढल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असला तरी या गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या तिजाेरीवर मोठा ताण पडणार आहे.- महापालिकेत ही गावे घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रारूप विकास आराखड्यानुसार तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले होते.- यात एकत्रित क्षेत्रासाठी ६१०० कोटी तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागतील, असे महापालिकेने नगरविकास कळविले हाेते, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लाेकमत’ला दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई