शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

६४ देशांना आवडे भारताचा कांदा, वर्षभरात २५ लाख टन निर्यात

By नामदेव मोरे | Updated: June 13, 2023 08:15 IST

४५२२ कोटी रुपयांची उलाढाल

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतामधून कृषी मालाची निर्यात वर्षनिहाय वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये विक्रमी निर्यात झाली आहे. जगभरातून भारतीय फळे, भाजीपाल्याला मागणी वाढत आहेच; पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख २५ हजार टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

कृषिप्रधान देश ही भारताची ओळख जगभर होऊ लागली आहे. भारतामधील फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या वस्तू, अन्नधान्य, दुग्धजन्य वस्तूंना २०४ देशांमधून मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला हा नाशीवंत कृषीमाल असूनही त्यांची निर्यात वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये २४४३ कोटींचा भाजीपाला. ३७८ कोटींचे आंबे, २५४३ कोटींचे द्राक्ष, २७३६ कोटी रुपयांची इतर फळे निर्यात केली आहेत. या सर्व भाजीपाला व फळांपेक्षाही भारतीय कांद्याला विदेशातून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

२०२० - २१ मध्ये १५ लाख ७८ हजार टन कांद्याची निर्यात होऊन २८२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१ - २२ मध्ये १५ लाख ३७ हजार टन कांद्याची निर्यात होऊन ३४३२ टन उलाढाल झाली होती. २०२२ - २३ या आर्थिक वर्षात विक्रमी २५ लाख २५ हजार २५८ टन निर्यात होऊन ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. 

तीन वर्षांत ६२ टक्के वाढ

कांदा निर्यातीमध्ये व उलाढालीमध्ये तीन वर्षांत ६२ टक्के वाढ झाली आहे. यंदा ६४ देशांमध्ये कांदा निर्यात झाला आहे. बांगलादेश, मलेशीया, यूएई, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, व्हिएतनाम, ओमान, कुवेत, सिंगापूर, इराक या देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

टॅग्स :onionकांदा