शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधून ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 04:35 IST

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

पनवेल : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ४२ पैकी १९ जणांनी व पंचायत समितीच्या ८० पैकी ४१ जणांनी अर्ज मागे घेतले. जिल्हा परिषदेच्या केळवणे व वडघर येथे भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे शेकापक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपा - सेना पनवेलमध्ये युती झाल्याची चर्चा सुरू झाली. वावंजे व नेरे येथे तिरंगी लढत सेना, भाजपा व शेकापक्षात होणार आहे. पाली-देवदमध्ये चौरंगी लढत होणार असून भाजपा,शेकापक्ष, बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन समाज पार्टी या उमेदवारांमध्ये लढत होईल. गव्हाणमध्ये सेना, भाजपा, शेकापक्ष व दोन अपक्ष अशी लढत होणार आहे.पंचायत समितीसाठी १६ जागांसाठी भाजपा १४, शिवसेना ८, शेकापक्ष ११, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४ व अपक्ष २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंध्रण, नेरे, पाली देवद, पळस्पे, कोन, पोयंजे, करंजाडे, वडघर, केळवण व आपटा या १० ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे तर वावंजे, आदई, विचुंबे, गुळसुंदे व वहाळ या ५ ठिकाणी तिरंगी लढत व गव्हाणला चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पोयंजे, करंजाडे या दोन ठिकाणी भाजपाने माघार घेतली आहे तर शेकापक्षाने ४ जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत.