शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात आगीच्या ५६६ घटना, हलगर्जीपणा कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:38 IST

वाशीत सर्वाधिक घटना

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात वर्षभरात आगीच्या ५६६ घटना घडल्या आहेत. त्यात रहिवासी वास्तूंसह व्यावसायिक ठिकाणांचा सर्वाधिक समावेश आहे. आगीपासून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने बहुतांश दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रहिवासी इमारतींसह व्यावसायिक आस्थापनांकडून फायर ऑडिटला बगल दिली जात आहे. अनेकदा बांधकामाच्या सुरुवातीला अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली जाते. मात्र त्यानंतर प्रतिवर्षी त्याचे ऑडिट करून यंत्रणा सक्रिय ठेवण्यात चालढकल केली जाते. परिणामी, एखादी दुर्घटना घडल्यास तिथली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी धाव घ्यावी लागते. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याचेदेखील काही घटनांमद्ये पाहायला मिळाले आहे. अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अशा वाणिज्य आस्थापना व रहिवासी इमारतींना अग्निशमन विभागाकडून वेळोवेळी नोटीसदेखील बजावली जाते. परंतु प्रशासनाकडून कारवाईचे ठोस पाऊल उचलले जात नसल्याने फायर ऑडिटबाबतचे फारसे गांभीर्य संबंधितांकडून घेतले जात नाही. अशाच प्रकारातून वर्षभरात शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गतवर्षात आगीच्या एकूण ५६६ छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात वाशी अग्निशमन विभागातील सर्वाधिक १४६ घटनांचा समावेश आहे. 

सीवूड येथील आग सर्वांत मोठी

n गतवर्षात लागलेल्या आगींमध्ये सीवूड येथे लागलेली आग सर्वांत मोठी होती. ८ फेब्रुवारीला पहाटे सी होम्स या २१ मजली इमारतीच्या १८व्या मजल्यावरील ही आग विझविताना सात जवान जखमी झालेहोते. 

n तर आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तासांहून अधिक कालावधी लागला होता. वाशी अग्निशमन केंद्र मुख्य केंद्र असल्याने जवळपासच्या विभागात आग लागल्यास वाशी अग्निशमन केंद्राचीच मदत घेतली जाते. 

महापालिका क्षेत्रात पाच ठिकाणच्या अग्निशमन केंद्रांमार्फत वर्षभरात आगीच्या ५६६ घटनांना वर्दी लावण्यात आली आहे. त्यात निवासी वास्तूंसह वाणिज्य आस्थापनांचा समावेश आहे. काही घटनांमध्ये तिथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग अधिक पसरल्याचे दिसून आले आहे.- शिरीष आरदवाड, अग्निशमन विभाग प्रमुख

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग