शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

५५० कोटींचे यंत्र करणार कर्करोगाच्या पेशींचा नाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 09:22 IST

खारघरच्या टाटा रुग्णालयात १२ लाखांचे उपचार मिळणार मोफत

पनवेल : कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे  सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या दुसऱ्या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी शुक्रवारी यशस्वी झाली. या मशिनची किंमत सुमारे ५५० कोटी एवढी आहे. अमेरिकेसारख्या देशात प्रोटॉन थेरपीच्या एकवेळेच्या उपचाराचा खर्च सुमारे १० ते १२ लाखाच्या घरात आहे. मात्र या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.टाटा मेमोरियल सेंटर एक्ट्रेक्ट, आयबीए बेल्जियम यांनी कक्षाची यशस्वी चाचणी केली. यावेळी एक्ट्रेक्टचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, डॉ. सिद्धार्थ लस्कर, आयबीए इंडियाचे संचालक राकेश पाठक उपस्थित होते. टीएमसीमार्फत सुरू करण्यात येणारी प्रोटॉन थेरपी देशातील सार्वजनिक भागीद्वारे सुरू करण्यात आलेली ही पहिलीच अद्ययावत उपचार पद्धती आहे. एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी थेरपी देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कॅन्सरवर वैद्यकीय उपचार करताना शरीरातील कर्ककारक नसलेल्या इतर पेशींना न मारता कॅन्सरसाठी कारणीभूत असलेल्या पेशींवर घाव घालण्यासाठी प्रोटॉन थेरपी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाने सुरू केलेल्या खारघर येथील केंद्रामध्ये हेड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र आणण्यात आले आहे. हे यंत्र केवळ शरीरामध्ये असलेल्या कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची बेल्जियममधील आयबीए कंपनीच्या माध्यमातून या मशीनची निर्मिती करण्यात आली. एआयबीएचे भारतातील संचालक राकेश पाठक यांच्या टीमच्या माध्यमातून प्रोटॉन थेरपीची यंत्रणा बसविण्याचे काम मागील काही काळापासून खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये सुरू आहे.जगभरातील १२० देशात अद्ययावत  उपचार पद्धतीजगातील केवळ १२० देशांमध्ये ही कर्करोगासाठी आधारित अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध आहे. सर्वसामान्य रुग्णांना विशेषतः लहान मुलांना या आधुनिक व प्रभावी उपचार पद्धतीचा लाभ होईल, असे आयबीएचे राकेश पाठक यांनी सांगितले. लवकरच संबंधित कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याने रुग्णांना या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.