शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

कोरोनातही ५४० कोटी मालमत्ता कर जमा, नवी मुंबईत अभय योजनेचा १९,८९१ जणांनी घेतला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:51 IST

NMMC News : कोरोनामुळे वर्षभरात शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही पालिका प्रशासन ४५० कोटी मालमत्ता कर संकलित करण्यात यशस्वी झाली आहे.

नवी मुंबई : कोरोनामुळे वर्षभरात शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही पालिका प्रशासन ४५० कोटी मालमत्ता कर संकलित करण्यात यशस्वी झाली आहे. अभय याेजनेचा १९,८९१ जणांनी लाभ घेतला असून त्यांच्याकडून १५९ कोटी जमा झाले आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसात ४६ कोटी ४२ लक्ष रुपये वसूल झाले  आहेत.  नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन वर्षभर दिवसरात्र परिश्रम करत आहे. या कालावधीमध्ये मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी वर्षभर नियमित आढावा घेऊन प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनाही कर वेळेत भरण्याचे आवाहन केले होेते. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान फक्त १४ कोटी रुपये वसूल झाले होते. यामुळे उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होणार की नाही याविषयी शंका उपस्थित होत  होती.  आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून पुढील तीन महिन्यांत जास्तीत जास्त कर वसूल करण्याचे निर्देश दिले. यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल ४०० कोटीपेक्षा जास्त कर वसूल झाला. पालिकेने थकबाकी वसूलीसाठी १५ डिसेंबर ते १५ मार्चदरम्यान  अभय योजना जाहीर केली होती. या दरम्यान दंड रकमेमध्ये ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. १६ मार्च ते ३१ मार्चदरम्यान दंड रकमेमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली  होती.  अभय योजनेमुळे १५९ कोटी कर वसूल झाला असून नागरिकांना ७८ कोटी ८६ लाख ६३ हजार ७५९ रुपये सवलत मिळाली आहे. वर्षअखेरीस तब्बल ४६ कोटी ४२ लाख ७९ हजार १८५ रुपये कर जमा झाला आहे. मालमत्ता करातून ५४० कोटी कर संकलित झाला आहे.  अभय योजना बंदमहानगरपालिकेने कोरोनामुळे नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. ३१ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आली आहे. यापुढे थकबाकीदारांना व्याज व दंडाची सर्व रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर मनपाच्यावतीने कोणालाही करामध्ये सवलत दिली जाणार नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTaxकर