शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

नवी मुंबईत दोन डेटा सेंटरमध्ये होणार ४७०३ कोटींची गुंतवणूक

By नारायण जाधव | Updated: August 16, 2023 18:14 IST

दिघा/महापे घेणार आकार : प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील डेटा सेंटरची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरात आणखी दोन उद्योग समूहांचे डेटा सेंटर येत असून त्यात ४७०३ कोटी ५९ लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. दोन्ही डेटा सेंटर शहरातील टीटीसी औद्याेगिक वसाहतीतच आकार घेणार आहेत.

यातील एक डेटा सेंटर दिघा येथे तर दुसरे महापेत बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरांत आयटी उद्योगांत आणखी शेकडो रोजगार निर्माण होणार आहेत. दोन्ही प्रकल्पांना पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती मिळाली आहे. यातील दिघा येथील डेटा सेंटर हे डेटा स्केप रिॲलिटी प्रा. लिमिटेड या कंपनीचे असून ते भूखंड क्रमांक १४/२, १५,३७ या सुमारे २६६१४ चौरस क्षेत्रावर ८४०८३ बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी दोन ब्लॉकमध्ये तळमजला अधिक सात माळ्यांच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. एका ब्लॉकमध्ये १२ डेटा हॉल असणार आहेत. याठिकाणी कंपनी ३२११ कोटी ९० लाख रुपये गुंतवणूक करणार आहे.दुसरे डेटा सेंटर महापे येथील भूखंड क्रमांक ई २०१,२०२ आणि २२९ वर कंट्रोल एस ही कंपनी आपल्या डेटा सेंटरचा विस्तार करणार आहे. या ठिकाणी ही कंपनी १४९१ कोटी ६९ लाख रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथे कंपनीने ३५ कोटी खर्चून १४५३३.७६ चौरस भूखंडावर ५३५०० चौरस मीटर बांधकाम करणार आहे. त्यासाठी कंपनीने पर्यावरण विभागाची परवानगीही घेतली होती. मात्र, अद्याप बांधकाम सुरू केलेले नव्हते. मात्र, कंपनीने या डाटा सेंटरचा विस्तार करण्याचा निर्णय घेऊन कंपनीने नव्याने ३५८२०.१९ चौरस मीटर क्षेत्रावर १,३६,७९७.१४ चौरस मीटर बांधकामाची परवानगी घेतली आहे. पाच वर्षांच्या आत बांधकाम करण्याची अट घालून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीस ही परवानगी दिली आहे. या कंपनीचे हैदराबाद आणि चेन्नई येथे डेटा सेंटर कार्यरत आहेत.