शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

याकूब बेग ट्रस्ट कार्यालयात ४७ लाखांची चोरी, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:09 IST

पनवेलमधील याकूब बेग ट्रस्टच्या कार्यालयातील सौदी अरेबिया देशाच्या रियालसह तब्बल ४६ लाख ७७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपये व एक कॅमेरा जप्त केला आहे.

पनवेल : पनवेलमधील याकूब बेग ट्रस्टच्या कार्यालयातील सौदी अरेबिया देशाच्या रियालसह तब्बल ४६ लाख ७७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपये व एक कॅमेरा जप्त केला आहे.पनवेल तालुक्यात ट्रस्टच्या शेतजमिनी असून, त्या कुळांना शेती लावण्यासाठी दिलेल्या आहेत. त्याचे उत्पन्न म्हणून भाडे व खंड अशी रक्कम स्वरूपात येत असून, सदरची रक्कम ट्रस्टच्या कार्यालयात कॅशबॉक्समध्ये ठेवली जाते. अशा पद्धतीने याकूब बेग ट्रस्टला महिन्याअखेर साधारण चार ते पाच लाख रु पयांचे उत्पन्न येते. गत नोव्हेंबर महिन्यामध्ये ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अलहाज म. मुस्तफा याकूब बेग यांनी ट्रस्टचे पोटरी अर्जुन राऊत यांच्याकडे चार लाख ७६ हजार रु पयांची रक्कम ठेवण्यासाठी दिली होती. त्या वेळी राऊत यांनी ट्रस्टच्या कार्यालयातील लोखंडी कपाटात कॅश बॉक्समध्ये सदरची रक्कम ठेवलेली होती. दरम्यानच्या काळात मुख्य ट्रस्टी हे परदेशात निघून गेल्याची संधी साधून एजाज हुसेन जलाल (५३), याने ट्रस्टच्या कार्यालयातील क्लार्क अफान अहमद शेख (३१) आणि चालक अकीब दिलावर पिंजारी (३३) या दोघांशी संगनमत करून कपाटातील चार लाख ७६ हजार रु पयांची रोख रक्कम, त्याचप्रमाणे मुख्य ट्रस्टी यांच्या कपाटातील ४२ लाख रुपयांच्या सौदी अरेबिया देशाच्या १० रियालच्या २० नोटा, अशी तब्बल ४६ लाख ७७ हजार रु पयांची चोरी केली. आपली चोरी पकडली जाऊ नये, यासाठी या तिघांनी ट्रस्टच्या कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआरचीदेखील चोरी केली. गेल्या आठवड्यात परदेशात गेलेले ट्रस्टचे मुख्य विश्वस्त बेग परतल्यानंतर त्यांनी ट्रस्टच्या पोटरीकडे दिलेल्या रकमेची मागणी केली. त्यामुळे पोटरी राऊत यांनी कपाटात पैसे तपासले असता, ते चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच मुख्य विश्वस्तांच्या कपाटातील सौदी अरेबिया देशाची ४२ लाख रुपयांची रक्कमदेखील चोरीला गेल्याचे आढळून आले. ट्रस्टचे पोटरी राऊत यांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

टॅग्स :Arrestअटक