शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत ४५७ इमारती धोकादायक; अतिधोकादायक इमारतींचाही वापर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:13 IST

दोन लाख नागरिकांचा जीव टांगणीला

- नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरातील ४५७ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. यामधील ६१ इमारती अतिधोकादायक असून, त्यांचा वापर तत्काळ बंद करणे आवश्यक असताना, त्यामधील ४७ इमारतींचा अद्याप वापर सुरू आहे. इमारतींच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया रखडल्यामुळे शहरातील जवळपास २ लाख नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत असून, अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मुंबईमधील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २४ जून रोजी ४५७ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. अतिधोकादायक इमारती तत्काळ मोकळ्या करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असून, दुरुस्ती करणे शक्य आहे, अशा इमारतींची विनाविलंब दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक, प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका ही यादी प्रसिद्ध करत असते. औपचारिकता व स्वत:च्या जबाबदारी झटकण्यासाठीच हा प्रकार केला जात असल्याची टीका होऊ लागली आहे.

अतिधोकादायक इमारतींमध्येही नागरिक वास्तव्य करत आहेत. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अनेक प्रस्ताव महानगरपालिकेला सादर करण्यात आले आहेत, परंतु या प्रकल्पांना वेळेत परवानगी दिली जात नाही. यामुळे नाईलाजाने नागरिकांना धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांमध्ये पुनर्बांधणीवरून मतभेद असून, त्यामुळे पुनर्बांधणीचे काम रखडत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील कांदा-बटाटा मार्केटही अतिधोकादायक असून, तेथे प्रतिदिन पाच हजारांपेक्षा जास्त नागरिक काम करत आहेत. मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह ही इमारतही धोकादायक घोषित केली आहे. सदर इमारतीमध्ये जवळपास दोन हजार नागरिकांची प्रतिदिन ये-जा सुरू असते. या इमातीचाही वापर अद्याप सुरूच आहे.

एपीएमसीजवळी अनेक कोल्डस्टोरेज व एक दूध डेअरी प्रकल्पाची इमारतही धोकादायक घोषित केली आहे. या इमारतींमध्येही शेकडो नागरिक काम करत आहेत. मागील वर्षभरात शहरात सहा ठिकाणी प्लास्टरचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. धोकादायक घोषित केलेल्या सर्व इमारतींमध्ये जवळपास २ लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. यापैकी एखादी इमारत कोसळून जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिका प्रशासनाने दुरुस्तीयोग्य इमारती तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या पाहिजेत. दुरुस्ती न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविला पाहिजे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. अनेक इमारती जर्जर झाल्या असून, कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. महानगरपालिकेने पुनर्बांधणीचा प्रश्न लवकर मार्गी लावला, तरच हा प्रश्न सुटणार आहे.- किशोर पाटकर, उपजिल्हा प्रमुख शिवसेना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई