पनवेल : पनवेल तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील कल्हे गावाच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर एक बेवारस कंटेनर आढळून आला. नवीन पनवेल पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असता त्यात रक्तचंदन आढळले. बाजारात या रक्तचंदनाची किंमत ४१ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या आठ साथीदारांचा शोध सुरू आहे.पनवेल तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील कल्हे गावाच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर बेवारस कंटेनर उभा असल्याची खबर नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रनाथ देशमुख यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह कंटेनरच्या क्रमांकावरून अधिक तपास सुरु केला. याप्रकरणी प्रशांत बबन भिलारे उर्फ राकेश (३६, रा. खारघर), किशोर जगन्नाथ यादव उर्फ अरुण (३३, रा. सातारा), अशोक बाबूराव शेरेकर (४७, रा. सातारा), किशोर गणपत बिरामणे (३१, रा. सातारा) व उमेश अशोक सिंग (३२, रा. कलिना मुंबई) यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)च्रक्तचंदनाची बेकायदा वृक्षतोड करून हे पाच आरोपी कर्नाटक राज्यातून रक्तचंदन आणून ते जेएनपीटी बंदरातून तस्करीमार्गे परदेशात पाठवित. च्पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून आठ जणांचा शोध सुरू आहे. च्उरणमध्येही काही दिवसांपूर्वी जेएनपीटीमार्गे येणारे रक्तचंदन पकडले होते.
४१ लाख ६० हजारांचे रक्तचंदन जप्त
By admin | Updated: March 7, 2015 22:26 IST