शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोची ४० हजार घरे; चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 02:45 IST

चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार

कमलाकर कांबळेनवी मुंबई : केंद्र सरकारच्या हाऊस फॉर ऑल या धोरणानुसार सिडकोने चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात चाळीस हजार घरे बांधली जाणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या घरांची योजना जाहीर केली जाण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सिडकोने परिवहन केंद्रित घरांच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्यानुसार सिडकोने मागील दोन-अडीच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना कागदोपत्री संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबापत्रेही वाटप करण्यात आली आहेत. परंतु कोरोना आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे पात्रताधारकांना अद्यापी प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळालेला नाही. असे असतानाच सिडकोने आणखी ४० हजार घरांची योजना तयार केली आहे.

नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरातील रेल्वेस्थानकांसमोर फोर्ट कोर्टचा परिसर, ट्रक टर्मिनल आणि बस आगाराच्या जागेवर ही घरे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. यातील ३५ टक्के घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी गृहप्रकल्पांच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घरविक्रीत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सिडकोने यावेळी विविध उपाययोजना केल्या आहेत.

घरांच्या मार्केटिंगसाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून ही योजना अधिकाधिक लोकापर्यंत नेण्याचा सिडकोचा प्रयत्न असणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घरविक्रीच्या पारंपरिक धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घरे विकण्याचा त्यांचा मानस आहे. तशा अशयाचा प्रस्ताव राज्याच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु त्यावर अद्यापी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येऊ घातलेल्या चाळीस हजार घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्जविक्री आणि संगणकीय सोडत या जुन्याच प्रणालीचा अवलंब केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आवास योजनेसाठी ३५ टक्के घरे सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०१८ मध्ये १४,८३८ आणि २०१९ मध्ये ९,२४७ अशा एकूण २४०८६ घरांची योजना जाहीर केली. यापैकी ५० टक्के घरे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित होती. परंतु यापुढील गृहप्रकल्पांतील घरांसाठी ही मर्यादा ३५ टक्के करण्यात आली आहे. तशा आशयाच्या ठरावाला सिडकोच्या संचालक मंडळाने मंजुरीही दिली आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या ४० हजार घरांपैकी ३५ टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई