शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात

By नारायण जाधव | Updated: August 11, 2024 08:54 IST

​​​​​​​मार्च २०२५ची डेडलाइन पाळण्यासाठी टेकडीचे सपाटीकरण गरजेचे

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्च २०२५ पर्यंत विमानोड्डाण करण्याचे ‘सिडको’चे  नियोजन आहे. मात्र, परिसरातील टेकडीचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीच्या  बांधकामासह विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी ती भुईसपाट करणे गरजेचे आहे. त्यासाठी विमानतळ विकासक कंपनी आणि सिडकोकडून गाभा क्षेत्रातील ओवळे गाव परिसरात सुरुंगाचे स्फोट करण्यात येत आहेत. अशा ४०० भूसुरुंग स्फोटांचे नियोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात केलेल्या सुरुंगाच्या स्फोटाच्या हादऱ्यामुळे घाबरलेल्या ओवळे ग्रामस्थांनी रस्त्यावरून आंदोलन करून काम बंद पाडले होते. ग्रामस्थांनी  विमानतळाचे कामच बंद पाडल्याने सिडको आणि विकासक कंपनीसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. कारण, ओवळे गाव हे विमानतळाच्या गाभा क्षेत्रातच असून, अद्यापही तेथील अनेक ग्रामस्थांनी सिडकोने दिलेल्या ठिकाणी आपला बाडबिस्तारा हलविलेला नाही. मनाप्रमाणे भूखंड न मिळाल्याने ग्रामस्थांनी घरे रिकामी केली नसल्याने ही कुटुंबे अजूनही त्याच ठिकाणी राहतात. सिडकोकडून मिळणारे भूखंड आमच्या सोयीनुसार ताब्यात द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. परंतु, तिची पूर्तता सिडकोने अद्याप केलेली नाही. 

धुळीचेही प्रदूषण

ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता टेकडीच्या सपाटीकरणासाठी सिडको आणि विकासक कंपनीने सुरुंगाचे स्फोट करणे सुरूच  ठेवले  आहे. यामुळे आवाजाच्या प्रदूषणासह निर्माण होणाऱ्या धुळीमुळे हवेचेही मोठे प्रदूषण होत आहे. तसेच हे स्फोट तीव्र स्वरूपाचे असल्याने कानठळ्या बसविणारा आवाज आणि हादऱ्यामुळे घरांना तडे गेले आहेत. त्यातच सीलिंकसाठी परिसरातील दगडखाणी बंद केल्या मग विमानतळासाठीचे हे स्फोट कशासाठी, त्याने आवाज, धुळीचे प्रदूषण होत नाही का, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.

दररोज ५० स्फोट

कायदा व सुव्यवस्थेसह ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून टेकडीच्या सपाटीकरणासाठी येत्या काही दिवसांत ४०० स्फोट करणे कसे गरजेचे आहे, याची जाणीव पोलिसांसह सिडकोने ग्रामस्थांनी करून दिली. त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्यांनीच केलेल्या सूचनेनुसार आता  दरदिवशी सकाळी २५ व सायंकाळी २५ असे स्फोट करण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले.

शेती घेतली, आता निवाराही धोक्यात

‘सिडको’ने आपली शेती  घेतली, आता आहे तो निवाराही धोक्यात आणल्याने ओवळे ग्रामस्थांत सिडकोसह विमानतळ विकासक  कंपनीविरोधात संतापाची भावना आहे. तिचा उद्रेक गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी विमानतळाचे काम बंद  पाडून दाखवून दिला. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता काही विपरित होऊ शकते, याची जाणीव नवी मुंबई पोलिसांना झाली. यामुळे त्यांनी समयसूचकता दाखवून ग्रामस्थांचे प्रतिनिधी, सिडको, विमानतळ विकासक कंपनीत समेट घडवला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळBlastस्फोट