शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वर्सोवा-विरार सेतूला ४० हजार कोटींचे कर्ज, एमएमआरडीएकडे सर्व कागदपत्रे  देण्याचे आदेश

By नारायण जाधव | Updated: November 13, 2022 10:14 IST

Versova-Virar Bridge : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता  एमएमआरडीए बांधणार आहे. जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे

- नारायण जाधव नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता  एमएमआरडीए बांधणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अर्थसाहाय्य  करणाऱ्या जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे.  यामुळे या मार्गाचे कामही लवकरात लवकरात हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या मार्गासाठी आता ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तो ४० हजार कोटींच्या गेला असून, त्यासाठी जायका अर्थसाहाय्य देण्यास तयार असल्याचे महानगर आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्याच्या एमएमआरडीएच्या  बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितले.

रस्ते विकास महामंडळाने दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांसह उत्तर मुंबईला जोडणाऱ्या वर्सोवा ते विरार ते या ५४ किमीच्या तिसऱ्या सी-लिंकच्या सुसाध्यता अहवालास सप्टेंबर २०२१  मान्यता दिली. होती. सध्या वरळी ते वांद्रा सागरी सेतूनंतर आता वांद्रा ते वर्साेवा या १७.७ किमीच्या सागरी पुलाच्या बांधकामाचे सात हजार कोटींच्या कंत्राटाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या पुलामुळे वांद्रा ते वर्सोवा हे दोन तासांचे अंतर हा पूल झाल्यावर १५ मिनिटांत कापता येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११ हजार ३३२ कोटींचा आहे. 

सल्लागार नेमण्याचे आदेश एमएसआरडीसीने सर्व कागदपत्रे एमएमआरडीएला देण्याचे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. ते मिळाल्यानंतर एमएसआरडीने ते संचालक मंडळासमोर ठेवून तातडीने सल्लागार नेमण्याची कार्यवाही करावी, असेही या बैठकीत ठरले आहे.

भाईंदर-वसई खाडीपुलास लाभविस्तारित वर्सोवा-विरार सागरी सेतूचा एमएमआरडीएच्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडीपुलासही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.भाईंदर खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून, तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे. या पुलावर एमएमआरडीए १० हजार ८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. 

नवी मुंबई विमानतळाला होणार फायदा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा संपूर्ण सागरी मार्ग भविष्यात ईस्टर्न फ्री वे आणि विरार-कॉरिडोरसह न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंकला जोडण्यात येणार आहे.  यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक जवळ येतीलच; शिवाय दक्षिण मुंबईसह नवी मुंबई गाठणेही अधिक सुकर होणार आहे. याचा फायदा भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणार आहे.