शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीतील ६० कुटुंबे भीतीच्या छायेत; जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:43 IST

३० तासांनंतरही हालचाली नाहीत; इमारत जमीनदोस्त करण्याच्या खर्चावरून वाद

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर ३ ई येथील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळल्याने इमारतीच्या मागील तसेच बाजूला असलेली जवळपास ६० घरे पनवेल महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ खाली केलीत. या वेळी एका दिवसात उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले; परंतु शुक्रवारचा पूर्ण दिवस गेला तरी या बाबत काहीच हालचाली होत नसल्याने रहिवाशांमधून रोष व्यक्त होत आहे.कळंबोली सिडको वसाहतीतील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला. या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे खाली करण्यास सांगितले. त्यानुसार सदनिकाधारकांनी घरे खाली केली. शुक्रवारी सकाळी इमारत पाडण्यात येणार असल्याने येथील रहिवाशांनी नातेवाइकांकडे आसरा घेतल्याचे विलास माने या रहिवाशांनी सांगितले. मात्र, शुक्रवारी संध्याकाळचे ६ वाजेपर्यंत कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतल्याने कामात अडथळा आला नसता. मात्र, महापालिका व रिधिमा सोसायटीधारक एकमेकांकडे बोट दाखवत इमारत पाडण्याचा खर्च करायचा कोणी? यावर चर्चा करण्यात दोन दिवस गेले.इमारत पुनर्बांधणीसाठी सिडकोने आम्हाला परवानगी दिलेली नाही. २०११ पासून सदनिकाधारकांनी देखभालीसाठी खर्च जमा करणे बंद केले आहे. तेव्हा इमारत महापालिकेने जमीनदोस्त करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी होती. तसे महापालिकेने इमारत पाडण्यास होकारही दिला; पण खर्च मोठ्या प्रमाणात येईल. येणारा खर्च रिधिमा सोसायटीने महापालिकेला भरला तरच पुनर्बांधणीसाठी परवानगी मिळेल, असा उपायुक्त यांनी सोसायटीधारकांसमोर खुलासा केल्याचे समजते. रिधिमा सोसायटीच्या बाजूला असलेली कृषिधन इमारत तसेच पाठीमागील सिडकोची ई १ टाइपमध्ये २०० रहिवासी वास्तव्यास आहेत. आम्ही किती दिवस घराबाहेर राहायचे, असा प्रश्न रहिवासी विचारात आहेत.ऐतिहासिक बापट वाडा मोजतोय अखेरची घटकापनवेल शहरातील सुमारे २७५ वर्षांची साक्ष देणारा ऐतिहासिक बापट वाडा सध्याच्या घडीला अखेरची घटका मोजत आहे. शुक्रवारी बापट वाड्याचा काही भाग कोसळल्याचे पालिकेने गांभीर्य लक्षात घेता धोकादायक भाग जमीनदोस्त केला. वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेलची ओळख होती. त्यापैकीच एक बापट वाडा असून दरवर्षी याठिकाणी कृष्णजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. पनवेल महानगर पालिकेने संबंधित बापट वाड्याला धोकादायक घोषित केले आहे. सध्याच्या घडीला वाड्यात काही रहिवासी वास्तव्यास आहेत. पालिकेचे ड प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी धोकादायक असलेल्या बापट वाड्याला तत्काळ नव्याने नोटीस बजावली आहे.या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या असल्याचे हजारे यांनी सांगितले. पनवेल शहरात सध्याच्या घडीला ६० धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे, २० ते २५ धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. रहिवासी व बांधकाम व्यावसायिकांचा वादामुळे अनेक जण घरे रिकामी करत नाहीत.मोडकळीस आलेली रिधिमा इमारत सोसायटीधारकांकडूनच पाडण्यात येणार आहे. या बाबत सदनिकाधारकांशी चर्चा केली आहे. मशिन तसेच येणारा खर्च सोसायटीकडून केला जाणार आहे. यासाठी सुमारे साडेपाच लाख खर्च अपेक्षित आहे. मशिन आल्यानंतर पाडण्यास सुरुवात केली जाईल.- कैलास सिंग, रहिवासी, रिधिमा सोसायटी