- नामदेव मोरेनवी मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गासह अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी आयुक्त कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. नवी मुंबईत १११ पैकी महिलांसाठी ५६ प्रभाग राखीव आहेत.
पहिल्यांदाच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार असली तरी ५० टक्के महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागांत दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. कारण, महिलांसाठीच्या आरक्षित जागांसह खुल्या जागांवरही त्याना लढण्याची मुभा असल्याने महापालिकेवर ‘महिलाराज’ येणार असल्याचे चित्र या सोडतीनंतर स्पष्ट झाले.
काही ठिकाणी प्रभागांचे आरक्षण काहीसे बदलले असले, तरी बाजूचा वॉर्ड अनेकांनी आधीपासूनच सज्ज ठेवल्याने त्यांना याचा फायदा होणार आहे. यात दिग्गजांना याचा फारसा फटका बसला नसला तरी एका वाॅर्डापुरती तयारी करून ठेवलेल्या लहान कार्यकर्त्यांचा पुरता हिरेमोड झाला आहे. सोडतीमध्ये पारदर्शीपणा यावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने दोन एलईडी स्क्रीन बसविल्या होत्या. सर्व प्रक्रिया सहज दिसेल अशी मांडणी केली होती.
Web Summary : Navi Mumbai's municipal elections will use a four-member panel system. Fifty-six wards are reserved for women. The draw for reservations took place, potentially leading to a 'women's rule' in the corporation. Some activists faced setbacks due to ward changes.
Web Summary : नवी मुंबई नगर निगम चुनावों में चार सदस्यीय पैनल प्रणाली का उपयोग होगा। छप्पन वार्ड महिलाओं के लिए आरक्षित हैं। आरक्षण के लिए ड्रा हुआ, जिससे निगम में 'महिला राज' हो सकता है। वार्ड परिवर्तन के कारण कुछ कार्यकर्ताओं को नुकसान हुआ।