शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

३८४ कामगारांसाठी न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:25 IST

पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश पालिकेत करण्यात आला.

वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश पालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतीतीत ३८४ कामगारांना पालिकेत सामावून घेण्यात आले. मात्र आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आयुक्तपदाचा पदभार हाती घेतल्यांनंतर संबंधित ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात कामगारांची अनावश्यक भरती झाल्याचा ठपका ठेवत कामगारांचा सहा महिन्यांचा पगार रोखून धरला. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा निर्णय अद्याप बाकी आहे मात्र कामगारांच्या प्रश्नावर पालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवक गंभीर असून यासंदर्भात गरज भासल्यास न्यायालयात जावू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.पनवेल महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील नगरसेवक हरेश केणी यांनी लक्षवेधी मांडली होती. ग्रामपंचायतीमधील कामगारांना पालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम ४९३ मध्ये स्पष्ट तरतूद असताना पालिका प्रशासन आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. यासंदर्भात समिती स्थापन करण्याची गरजच नव्हती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका या कामगारांना मागील आठ ते नऊ महिन्यापासून राबवून घेत आहे. यापैकी सहा महिन्यांचा पगार कामगारांना पालिकेने दिला असला तरी अजून तीन महिन्यांचा पगार रोखून धरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा न काढल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे नगरसेवक हरेश केणी यांनी सांगितले. कामगार संघटना देखील या विषयावर गंभीर असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचे अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.>काय आहे कामगारभरती प्रकरण ?पनवेल महापालिकेत २३ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी ही भरती आरक्षणानुसार देखील झाली नसल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे. ज्या ठिकाणी ५ जागांची आवश्यकता होती त्याठिकाणी ३० ते ४० कामगारांची भरती केली असल्यामुळे हा कामगारांना पालिकेत सामावून घेण्यासंदर्भात पालिका प्रशासन तयार नसल्याचे बोलले जाते.>कामगारांच्या भरतीसंदर्भात समितीची स्थापनाकामगारांच्या भरतीत अनियमितता असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अंतिम अहवाल काही दिवसातच समोर येईल. त्यामुळे समितीच्या अहवालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.>सत्ताधाºयांपेक्षा विरोधक कामगारांच्या पाठीशीपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये शेकापची सत्ता होती. त्यांच्यामार्फत अनेक कामगारांची भरती झाली असल्यामुळे सत्ताधारी भाजपा या विषयावर गप्प असल्याचे बोलले जाते. मात्र शेकाप या कामगारांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगत आले आहे. कामगारांनी काढलेल्या मोर्च्यात शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील हे उघडपणे मोर्च्यात सहभागी झाले होते . भाजपाच्या नेत्यांनी मात्र या मोर्च्यात सहभाग घेतला नव्हता.