शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ३५ हजार अर्ज, ३१ जानेवारीपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 23:23 IST

ऑगस्ट २0१८ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या ११00 घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या शिल्लक घरांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट २0१८ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या ११00 घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. पहिल्या टप्प्यात संधी हुकलेल्या ग्राहकांनी यावेळी पुन्हा नशीब आजमाविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या वीस दिवसांत तब्बल ३५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी १७,७१७ ग्राहकांनी अनामत रकमेचा भरणाही केला आहे. उर्वरित दहा दिवसांत अर्जाचा हा आकडा ५0 हजारांचा पल्ला गाठेल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.आॅगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी १४,८३८ घरांच्या गृहयोजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेला राज्यभरातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४,८३८ घरांसाठी सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. यातील पात्र दर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. यात यशस्वी झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी व इतर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी १४,८३४ पैकी तब्बल ११00 घरे विक्रीविना पडून आहेत. यातील बहुतांशी घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यामुळे या शिल्लक घरांची सुध्दा विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्यानुसार १ जानेवारीपासून सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात अकराशे घरांसाठी आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.पहिल्या सोडतीत संधी हुकलेल्यांना ही सुवर्णसंधी असल्याने मागील वीस दिवसांपासून ग्राहकांनी ३४ हजार ७९२ अर्ज भरले आहेत. यापैकी १७,७१७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणाही केला आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिल्लक घरांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची लगेच १४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.