शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:59 IST

विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे  उपाध्यक्ष  ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले आले.

पनवेल : सिडकोच्या निरनिराळ्या विभागांतील लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई तसेच अग्निशामन दल विभागात ३५० कर्मचारी मागील १४ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी हे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त असून, भत्ते नाकारल्याने त्यांनी मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून गुरुवारी बेलापूरच्या अर्बन हाट येथे आंदोलन केले.

विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे  उपाध्यक्ष  ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले आले. किमान वेतन अधिनियम, १९४८ च्या तरतुदीप्रमाणे वेतन, भत्ते व इतर सेवासवलती देणे बंधनकारक असताना, या कर्मचाऱ्यांना दुकाने व व्यापारी आस्थापना या उद्योगांतील कामगारांप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. 

भविष्यनिर्वाह निधीचा केला अपहार कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करून ठेकेदाराने ही रक्कम भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात जमा केलेली नाही. अशा प्रकारे गेले १८ महिने या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली लाखो रुपयांची रक्कम या ठेकेदाराने भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात भरली नसून, या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

टॅग्स :cidcoसिडको