शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 10:57 IST

ठेकेदाराची नियुक्ती, ४ वर्षांत प्रकल्प पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे- बेलापूर रोड, पामबीच आणि सायन- पनवेल या प्रमुख मार्गांवरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीने सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुर्भे- खारघरदरम्यान लिंक रोड तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. 

आकस्मिक खर्चासह ३,१६६ कोटी ७८ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाशी ते खारघरदरम्यानच्या प्रवासात १५ मिनिटांची बचत होणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी नवी मुंबईतील दळणवळण यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रित करुन विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तुर्भे ते खारघर हा ५.४९ किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग हा याच नियोजनाचा भाग आहे.

कागदावरचा प्रकल्प अखेर मार्गी  विशेष म्हणजे पूर्वी राज्य शासनाने या प्रकल्पाची जबाबदारी रस्ते महामंडळ अर्थात एमएसआरडीसीवर सोपविली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा विकास आराखडाही तयार केला होता. मात्र, कालांतराने रस्ते महामंडळाला हा प्रकल्प व्यवहार्य वाटला नाही. त्यामुळे माघार घेतली.   मागील पाच वर्षांपासून कागदावरच सीमित राहिलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य शासनाने सिडकोवर टाकली आहे. त्यानुसार  या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सिडकोने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला चार बड्या कंपन्यांनी प्रतिसाद देत प्रस्ताव सादर केले होते.   त्यापैकी लघुतम कोट असलेल्या रित्विक एव्हरास्कॉन या संयुक्त भागीदारातील कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या संचालक मंडळानेसुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे रखडलेला तुर्भे-खारघर लिंक रोडचा मार्ग मोकळा झाला.