शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेट कॉरिडॉरमध्ये होणार ३०४३ खारफुटींची कत्तल, जेएनपीटी-दादरी दुपदरी रेल्वे मार्ग

By नारायण जाधव | Updated: December 1, 2022 20:18 IST

देशात रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत मैलाचा दगड ठरणारा जेएनपीटी ते दादरी मार्गे दिल्ली या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम कोविड महामारीमुळे रखडले हाेते.

नवी मुंबई : देशात रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत मैलाचा दगड ठरणारा जेएनपीटी ते दादरी मार्गे दिल्ली या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम कोविड महामारीमुळे रखडले हाेते. आता कोविडची साथ आटोक्यात आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे महाराष्ट्रातील जेएनपीटीपासूनचे काम वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा दुपदरी मार्ग टाकण्यासाठी ३०४३ खारफुटींची कत्तल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, हा विषय पर्यावरणाशी संबंधित गंभीर असल्याने आणि पंतप्रधान कार्यालयाचे त्यावर लक्ष असल्याने सीआरझेड प्राधिकरणाने १० नोव्हेंबर २०२२ रोजी तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जेएनपीटी ते दादरी या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरकरिता यापूर्वी २०१४ मध्ये सात वर्षांकरिता सीआरझेडचे ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यावेळी ५४३ खारफुटींची कत्तल करण्यासही मान्यता मिळाली होती. मात्र, मधल्या काळात आलेल्या कोविड महामारीच्या साथीमुळे हे काम रखडले. पुरेसा कामगार उपलब्ध न होणे, हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे.तीन वर्षांची हवी मुदतवाढयाच दरम्यान सीआरझेडच्या ना-हरकत प्रमाणपत्राची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्येच संपली आहे. यामुळे पुन्हा नव्याने ती वाढवून मिळण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरने अर्ज केला आहे. शिवाय या दरम्यान बाधित होणाऱ्या खारफुटींची संख्या ३०४३ झाली असून, ती ताेडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये परवानगी दिली आहे. त्यानुसार सीआरझेड प्रमाणपत्रास तीन वर्षांकरिता मुदतवाढ मागितली आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे आहे लक्ष

जेएनपीटी ते दादरी या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा अतिमहत्त्वाचा प्रकल्प असून, त्यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विविध देशांतून समुद्र मार्गे येणाऱ्या मालाची उत्तर भारतात वेगाने वाहतूक करण्याच्या दृष्टीने हा मार्ग खूप महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे पंतप्रधान कार्यालयाने तो वेळेत पूर्ण करण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे पुढे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सीआरझेड प्राधिकरणाने १० नोव्हेंबर २०२२ रोजी अंतिम मंजुरीसाठी केंद्रिय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

दररोज १० हजार कंटेनरच्या इंधनाची बचत

या मार्गावरील एका मालवाहू रेल्वेची ४०० ट्रकच्या समतुल्य भार वाहून नेण्याची असणार आहे. अशा २५ रेल्वे दररोज १०००० कंटेनर क्षमतेची मालवाहतूक करू शकतात. यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दररोजच्या १०००० ट्रकला लागणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे. शिवाय रस्त्यांवरील भार कमी होऊन वेळेत लक्षणीय बचत होणार आहे.

पाच कोटी वृक्षलागवडीचा संकल्प

जेएनपीटी ते दिल्लीपर्यंतच्या या फ्रेट कॉरिडॉरच्या मार्गाआड येणाऱ्या वृक्षांचीही मोठ्या संख्येने कत्तल झालेली असून, पुढच्या टप्प्यात ती आणखी होणार आहे. ही भरपाई भरून काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या १४८३ किमी मार्गाच्या दुतर्फा पाच कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई