शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अधिक नफ्याचे आमिष दाखवून २७४ जणांची केली फसवणूक; एपीएमसीतील कार्यालय गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 00:58 IST

जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट कंपनीत नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट कंपनीत नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये २७४ जणांची ६० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुख १९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बनावट कंपनीचे कार्यालय थाटून त्याद्वारे गुंतवणूकदारांना जादा नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली आहे. शक्ती मल्टीपर्पज सोसायटी असे कंपनीचे नाव असून एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये त्याचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्याठिकाणी ठरावीक वर्षासाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यास दरमहिना नफ्याचे तसेच मुदतीनंतरही जादा रकमेच्या नफ्याचे आमिष दाखवले जात होते. तसेच इतरांनाही गुंतवणुकीस प्रोत्साहित केल्यास त्याचेही कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी दहा हजार रुपये ते एक लाखापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली होती. प्रत्यक्षात मात्र त्या सर्वांची फसवणूक झाली असून त्यापैकी २७४ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांची एकूण ६० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागामार्फत एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील तीन वर्षापासून एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केटच्या आवारात शक्ती मल्टीपर्पज सोसायटीचे कार्यालय सुरू होते. कंपनीच्या दलालांमार्फत तसेच ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांच्यामार्फत इतरांनाही गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जात होते. मात्र ज्यांच्या गुंतवणुकीची मुदत संपली आहे, असे गुंतवणूकदार मागील काही महिन्यांपासून कंपनीच्या कार्यालयात फेऱ्या मारत होते. परंतु त्यांना नफ्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर काही दिवसांपूर्वी कंपनीचे कार्यालय गुंडाळून संबंधितांनी पळ काढल्याचे समोर आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष तसेच दलाल व कार्यालयातील कर्मचारी अशा १९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीचे पुण्यात देखील कार्यालय होते, असे काही गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. त्यानुसार इतर शहरातील नागरिकांना देखील गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी