शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

फॉरेन्सिक तपासासाठी आता २५४ वाहने व २२०० तज्ज्ञ; १३७२.३६ कोटी रूपयांच्या तरतुदीला मंजुरी 

By नारायण जाधव | Updated: July 30, 2024 08:34 IST

२१ वाहनांची लवकरच खरेदी

नारायण जाधव, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ ची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली असून महाराष्ट्रात १ जुलैपासून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.  या नव्या फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत आता गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या कायद्यामध्ये ज्या प्रकरणात सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कामासाठी आता राज्यातील पोलिस दलात कंत्राटी तत्त्वावरील फॉरेन्सिक तज्ज्ञांसह २२०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच २५४ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांची खरेदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नव्या फॉरेन्सिक यंत्रणेसाठी १३७२.३६ कोटी रूपयांचा निधी लागणार असून त्याला गृह विभागाने तत्त्वत: मान्यताही दिली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात आता नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकरिता ३, मुंबई आणि नागपूर आयुक्तालयाकरिता प्रत्येकी ५ आणि जळगाव जिल्ह्यासाठी ८ अशा २१ वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी ३२ कोटी ३ लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरीही देण्यात आली आहे.

गुन्हे स्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून जतन करणे, तसेच संबंधित व्हिडीओ व छायाचित्रण करणे, यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना आवश्यक किट, केमिकल्स तसेच मोबाइल व्हॅनची आवश्यकता आहे. 

समितीने केला होता सर्वंकष अभ्यास

रासायनिक व वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून अहवाल मागवण्यात आला होता. या समितीमध्ये फॉरेन्सिक अर्थात न्यायसहाय्यक वैज्ञानिक संचालनालयातील सर्व विभाग प्रमुखांचा समावेश होता. या समितीने सर्वंकष अभ्यास करून काही शिफारसी दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) यांनी मार्च महिन्यात २५४ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांसह २२०० अधिकारी-कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला उच्चस्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर तो गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच तपासाचे काम

फोरेन्सिक यंत्रणेसाठी आवश्यक २२०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरुवातीला कंत्राटी वा बाह्ययंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर दरवर्षी २० टक्के याप्रमाणे पुढील ५ वर्षांत ते नियमित तत्त्वावर सेवेत घेण्याचा विचार आहे. मोबाइल फोरेन्सिक व्हॅनवरील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करताना संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार त्यांची शैक्षणिक अर्हता राहील. त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच त्यांना घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई