शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

उंदीर मारण्यासाठी २५ हजारांचा भुर्दंड

By admin | Updated: July 4, 2017 07:14 IST

पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही

नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही भार पडू लागला आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाले आहेत. रोज पालिकेच्या तिजोरीतील २५ हजार रुपये यासाठी खर्च झाले असून, वर्षभरामध्ये १ लाख ४३ हजार उंदीर मारल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या नावाखाली प्रत्येक वर्षी १०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला जात आहे; पण प्रत्यक्ष या पैशांचा योग्य वापर होत नाही. आरोग्यावरील खर्च व्यर्थ होऊ लागला आहे. श्वान व मूषक नियंत्रण कार्यक्रमावरील खर्चही असाच पाण्यात जात आहे. २०१५-१६ वर्षामध्ये श्वान निर्बीजीकरणावर तब्बल १ कोटी ३ लाख रुपये खर्च झाले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून फक्त ५१०७ श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वास्तविक शहरातील श्वानांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक वर्षी किमान १२ ते १५ हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होणे आवश्क आहे; पण निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आलेल्या अपयशामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे पालिकेला शक्य झालेले नाही. मूषक नियंत्रण कार्यक्रमाच्या बाबतीमध्येही हाच प्रकार होत आहे. आयुक्तांच्या अधिकारामध्ये डिसेंबरमध्ये तब्बल २४ लाख ६७ हजार रुपयांचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे.पालिकेच्या वार्षिक प्रशासन अहवालामध्ये मूषक नियंत्रणाविषयी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये मूषक नियंत्रणासाठी ४८५२ पिंजऱ्यांचा उपयोग करण्यात आला. वर्षभर ६ लाख २४ हजार ३३९ बिळे धूरीकरण करण्यात आली व तब्बल १ लाख ४३ हजार २५ उंदीर मारण्यात आले आहेत. उंदीर मारणे, पिंजरे खरेदी व धूरीकरणासाठी तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर ३६५ दिवसांमध्ये रोज सरासरी ३९१ उंदीर मारण्यात आले असून, यासाठी रोज २५२९३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. उंदरांचा उपद्रव वाढला असल्यास तक्रार कोणाकडे करायची. पिंजऱ्याची किंवा धूरीकरणाची आवश्यकता असल्यास कोणाशी संपर्क साधायचा? याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याने उंदरांचा त्रास होत असतानाही नागरिकांना वैयक्तिक खर्च करून उपाययोजना करावी लागत आहे. उंदरांमुळे प्रचंड नुकसानशहरामध्ये उंदरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. झोपडपट्टीसह विकसित नोडमध्येही उंदरांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोसायटी आवारामध्ये उभ्या वाहनांची वायर कुरतडण्याचे प्रकार नियमित घडत आहेत. कार्यालयातील संगणक व इतर साहित्याची नासधूस होत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पालिकेच्या कोणत्या विभागाकडे याविषयी तक्रार करायची व धूरीकरणासह इतर उपाययोजना कोण करते? याविषयी माहिती नागरिकांना नसल्याने नुकसान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.