शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पनवेल ते रसायनी २५ मिनिटांच्या प्रवासाला खड्ड्यांमुळे लागतो १ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:52 IST

राज्य मार्ग क्रमांक १०५ची दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

वैभव गायकरपनवेल: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा राज्य मार्ग क्रमांक १०५ हा खड्ड्यांमुळे चर्चेत आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल-रसायनी या दोन शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र 

पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. अवजड वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. तसेच या मार्गालगतच मोठ्या प्रमाणात गावे वसलेली असल्याने येथील रहिवासी या मार्गावरून ये-जा करीत असतात.  २० ते २५ मिनिटांचा कालावधी गाठण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास लागत असल्याने वाहनचालकांचा वेळ आणि इंधनही वाया जात आहे. रसायनीत असलेल्या आद्योगिक वसाहतीमुळे नोकरदार याच मार्गावरून प्रवास करतात. मनेसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात जाब विचारण्यासाठी निवेदनही दिले गेले होते. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य संदीप भगत हे मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र केवळ आश्वासने देण्यात येतात. येथील खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. दहा किमीच्या या मार्गावर पथदिवेदेखील नसल्याने अपघातांचा धोका अधिक असतो.

अनेक वेळा तक्रारी करूनदेखील काहीच उपयोग होत नाही. आजवर अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडले आहेत. तरी काहीच उपाययोजना होत नाही. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरती डागडुजी केली जाते. पावसाळ्यात या मार्गावर पुन्हा खड्डे पडतात. वर्षभर याच खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागतो.     - नंदकिशोर माळी , वाहन चालक

नागरिक करतात पर्यायी मार्गाचा वापरकोन-सावळा मार्गाच्या दुरवस्थेमुळे अनके वाहनचालक शेडुंग फाटा येथे टोल भरून पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. रसायनीत असलेल्या पिल्लई महाविद्यालयात मुंबई उपनगरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अशा विद्यार्थ्यांनादेखील या खराब मार्गाचा फटका बसतो. 

महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ पनवेल-रसायनीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत हा रस्ता आहे. येथे यापूर्वी टोल वसुली होत असे तेव्हा मार्ग सुस्थितीत होता. टोल बंद झाल्यापासून खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर सतत अवजड वाहनांची येजा असते. भविष्यात आणखी वाहनांचा वर्दळ वाढणार आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

कोन-सावळा या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पूरहानी दुरुस्ती अंतर्गत शासनाकडे पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित निविदा काढून रस्त्याची डागडुजी करण्यात येईल. सलग दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गाची दुरवस्था झाली असून यासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.                            - नितीन भोये , उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल