शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी काढताना पाय घसरला, माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:47 IST

सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी घडली आहे.

मयुर तांबडे

नवीन पनवेल : सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी घडली आहे. शुभांगी विनायक पटेल (दत्तवाडी, पुणे ) असे मृत महिलेचे नाव आहे. दोघे पती पत्नी ट्रेकिंग करता गेलेले असताना सेल्फी काढताना पाय घसरून ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. शुभांगी आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते.

शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनिमून साठी 28 डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंग साठी गेले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला.

शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या महिलेला तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेडुंग  चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे,अमर भालसिंग तसेच एपीआय अर्चना कुदळे, एपीआय सचिन पोवार, पीएसआय हर्षल रजपूत, सोनकांबळे घटनास्थळी गेले. पोलिसांच्या, स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले.