शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एका आठवड्यात चोवीस कोटी वसूल, महापालिकेची ‘अभय योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:40 IST

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही.

नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना’ सुरू केली आहे. एक आठवड्यात २४ कोटी १८ लक्ष रुपये थकबाकी जमा झाली आहे. मोठ्या थकबाकीदारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीतजास्त मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अभय योजनेच्या कालावधीतही कर भरणा न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही. थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कर भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. अभय योजनेच्या काळात कर भरणा करणारांना दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. मूळ रक्कम व २५ टक्के दंड भरावा लागणार आहे. १ एप्रिल ते २१ डिसेंबरदरम्यान १८७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. अभय योजना सुरू केल्यापासून एक आठवड्यात २४ कोटी १८ लक्ष रुपये कर वसुली झाली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाेले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कर भरणे ही प्रत्येक मालमत्ताकरधारकाची जबाबदारी आहे. थकबाकीदारांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अनेक मोठे थकबाकीदार कर भरणा करीत नाहीत. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे. त्यांच्यावर कारवाई करून कर वसूल करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या. अभय योजना सुरू केल्यापासून नेरूळ एमआयडीसीमधील जी. एस. सेठी अँड सन्स यांनी  ४८  लाख ६६ हजार २७९ रुपये कर भरणा केला आहे. नेरूळ सेक्टर ३८ मधील स्टोन लाईफस्पेस यांनी ३० लाख ३५ हजार ६५० रुपये कर भरणा केला आहे. जास्तीतजास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी  केले आहे. 

मालमत्ता जप्त करणारअभय योजना काळात जे थकबाकीदार कर भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात येणार आहेत. मालमत्ता जप्त करणे व इतर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येकानी कर भरणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर कर भरावा. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका