शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी 

By नारायण जाधव | Updated: August 5, 2023 13:48 IST

पुणे- मुंबईतील प्रकल्पातही ८ हजारांवर झाडे बाधित

नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे- भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. यानुसार बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणारी मुंबई आणि पालघरमधील २,३६८ झाडे तोडण्यास आणि ४२५ झाडांचे पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे.

यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या वसई- विरार महापालिकेच्या हद्दीतील नऊ हेरिटेज वृक्षांसह १,३६८ वृक्ष तोडण्यास सहाव्या बैठकीत मंजुरी दिलेली होती. त्यांचे सरासरी आयुष्यमान १४,५८६ वर्षे आहे.

आता पुन्हा मुंबईच्या विक्रोळी येथील १,६८७ झाडांची तोड करण्यास आणि १४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या वृक्षांचे सरासरी आयुष्यमान ५,३१७ वर्षे आहे, तर यापूर्वी सहाव्या बैठकीत हा प्रस्ताव परत पाठविलेला पालघरमधील ६८१ झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव आठव्या बैठकीत मंजूर केला आहे. यात पालघरच्या मोरीवली, वेवूर, नावाळी आणि घोलविरा गावाच्या हद्दीतील ज्या ६८१ झाडांची कत्तल आणि ३८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन आणि पालघर नगर परिषदेने वृत्तपत्रात यासंबंधीची जाहिरात न देताच सहाव्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामुळे तेव्हा तो वृक्ष प्राधिकरण समितीने परत पाठवून वृत्तपत्रात जनतेच्या माहितीसाठी जाहिरात देऊन आणण्यास सांगितले होते. ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर आता आठव्या बैठकीत त्यास मान्यता देेण्यात आली आहे.

पहिलाच प्रकल्प पुण्यात मुळा-मुठाच्या विकासात ७,४९६ वृक्ष बाधितपुण्याच्या मुळा-मुठा रिव्हर फ्रंटसाठी ३,०६७ झाडांची कत्तल आणि ४,४२९ झाडांचे पुनर्राेपण करण्यात येणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणारा अलीकडच्या काळातील हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे.

२६२ झाडांची कुर्ला येथे कत्तल गेल्या आठवड्यात राज्याच्या महसूल आणि वन विभागाने ठाणे आणि पालघरमधील ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनला सुपुर्द केली आहे. याशिवाय याच बैठकीत मुंबईतील भांडूप येथील मुंबई महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १४४ झाडांची तोड करण्याची आणि ३०४ झाडांचे पुनर्रोपण, तसेच मेट्रोच्या मार्ग क्रमांक २ बीसाठी कुर्ला येथे २६२ झाडांची कत्तल आणि ५३० झाडांच्या पुनर्रोपणासही मंजुरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNavi Mumbaiनवी मुंबई