शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील २२ इमारती धोकादायक; इमारती रिकामी करण्यासाठी सोसायटींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:54 IST

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा इमारतींना पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने या २२ सोसायट्यांना इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.सुकापूर गावात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागलेली आहे. २0११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४ हजार ९९0 आहे, ...

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा इमारतींना पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने या २२ सोसायट्यांना इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.सुकापूर गावात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागलेली आहे. २0११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४ हजार ९९0 आहे, तर सद्यस्थितीत लोकसंख्या ३५ हजारपेक्षा जास्त आहे. नवीन पनवेल शहरालाच सुकापूर गाव लागून असल्याने मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढू लागली आहे. ग्रामपंचायत हद्दीत २७२ सोसायट्या आहेत. त्यामुळे मोठमोठ्या इमारती सुकापूरमध्ये उभ्या राहिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने अशा प्रकारच्या धोकादायक इमारती पडून अपघात होण्याची दाट शक्यता असते.पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने धोकादायक इमारतीत वास्तव्य करणे जीवावर बेतू शकते. पावसाळ्यामध्ये संभाव्य अतिवृष्टी, वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतींमध्ये कोणीही वास्तव्य करू नये अशा नोटिसा ग्रामपंचायतीमार्फत सोसायटीधारकांना पाठविण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य केल्यास कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या गृहनिर्माण सोसायटीने सर्व सदस्यांसह इमारत खाली करून इमारतीचेस्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यास सांगितले आहे.जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. लेखा परीक्षणामध्ये ज्या इमारती दुरुस्ती करून त्यांचा वापर करणे शक्य असेल त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ज्या इमारती अतिधोकादायक आहेत त्या सुरक्षिततेसाठी खाली करणे आवश्यक आहे.काय आहे नोटीसमध्ये?पालीदेवद ग्रामपंचायत हद्दीतील आपण राहत असलेली इमारत धोकादायक असल्याने ग्रामपंचायतीच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरील इमारत कोणत्याहीक्षणी पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या पावसाळा सुरू असल्याने अशा प्रकारच्या धोकादायक इमारती पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण राहत असलेली इमारत धोकादायक असल्याने अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास आपल्या इमारतीत राहणाऱ्या तसेच शेजारील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो.आपण आपल्या गृहनिर्माण सोसायटीतील सर्व सदस्यांसह सदरील इमारत खाली करून सदर इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे व त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. अशाप्रकारचा मजकूर नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे.नोटीस दिलेल्या इमारतीशांतीनिकेतन गृहनिर्माण सोसायटीत्रिदेव गृहनिर्माण सोसायटीसाई सागर गृहनिर्माण सोसायटीशिवसागर गृहनिर्माण सोसायटीज्योती गृहनिर्माण सोसायटीस्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीसिद्धी गृहनिर्माण सोसायटीफिनिक्स गृहनिर्माण सोसायटीश्री सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीअवंतिका गृहनिर्माण सोसायटीनिर्मळ गृहनिर्माण सोसायटीस्नेहकुंज गृहनिर्माण सोसायटीप्रेरणा गृहनिर्माण सोसायटीश्री गणेश गृहनिर्माण सोसायटीचेतना गृहनिर्माण सोसायटीश्रीनिवास गृहनिर्माण सोसायटीनवजीवन गृहनिर्माण सोसायटीआकाश दीप गृहनिर्माण सोसायटीस्नेह सागर गृहनिर्माण सोसायटीशांती सागर गृहनिर्माण सोसायटीप्रभात गृहनिर्माण सोसायटीसाईनाथ गृहनिर्माण सोसायटी२२ इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठीच्या ठरावाला ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली आहे. तरी इमारतीतील रहिवाशांनी या इमारती लवकरात लवकर खाली कराव्यात व स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे. २२ इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च ग्रामपंचायत करेल.- नंंदकिशोर भगत,ग्रामसेवक,पाली देवद ग्रामपंचायत

टॅग्स :panvelपनवेल