शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२१ गावांपुढे पाणीटंचाईचा प्रश्न

By admin | Updated: February 4, 2016 02:40 IST

शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

महाड : शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. दीड वर्षापूर्वी या धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याच्या कामाला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने महाड शहरासह २१ गावांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवाय या धरणाला पडलेल्या भगदाडामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. महाड रायगड मार्गालगत १९७४ मध्ये कोथुर्डे येथील नदीवर हे पाटबंधारे विभागामार्फत बंधाराकम धरण बांधण्यात आले होते. या धरणातील पाण्यावर महाड शहरासह रायगड मार्गावरील अनेक गावांच्या नळपाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. फेबु्रवारी महिन्यानंतर परिसरातील वाहणाऱ्या गांधारी नदीमध्ये या धरणाचे पाणी सोडले जाते व या नदीच्या पात्रात असलेल्या जॅकवेलमधून या परिसरातील गावांची तहान भागवली जात आहे. जुलै २०१४ मध्ये पावसाळ्यात या धरणाच्या भिंतीला २० फूट खोल खड्डा पडून भिंतीचा भाग खचला होता. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती केली तरी भगदाडातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. या धरणाल धोका निर्माण होऊ नये म्हणून धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असून, तो पाटबंधारे विभागात मंजुरीसाठी प्रलंबित आहे.धरणाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ९६ लाख इतका खर्च अपेक्षित असून, मुख्य विमोचन विहीर जलवाहिनी दुरुस्ती व अश्वपटल मातीकाम आदी कामे केली जाणार आहेत. २०१४ मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काम करण्यासाठी धरणातील पाणी सोडल्यास पाणीटंचाई निर्माण झाली असती. त्यामुळे धरणातील पाणी न सोडताच धरणाची दुरुस्ती करण्याबाबत पाटबंधारे विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याने हे काम रखडल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)