शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खाडीकिनाऱ्यावर ४ वर्षांत २०० स्वच्छता मोहिमा

By नामदेव मोरे | Updated: June 16, 2024 18:20 IST

६०० टन कचरा संकलित : पर्यावरण रक्षणासाठी ६० हजार नागरिकांनी दिले योगदान

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खाडीकिनारा स्वच्छ करण्यासाठी २०२० मध्ये सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने नॉनस्टॉप २०० आठवड्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. नवी मुंबईत सुरू झालेली ही चळवळ मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत पोहोचली असून प्रत्येक रविवारी शेकडो पर्यावरणप्रेमी या अभियानात सहभागी होत आहेत. आतापर्यंत ६० हजार स्वयंसेवकांनी पर्यावरणरक्षणासाठी योगदान दिले आहे. खाडीतून ६०० टन कचरा काढण्यात यश आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील अनेक शहरांमधील कचरा नैसर्गिक नाल्यांमधून समुद्रात टाकला जातो. यामध्ये प्लास्टिकसह विघटन न होणाऱ्या विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश असतो. समुद्र हा कचरा भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्याकडे ढकलतो. किनाऱ्यावर या कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. कोरोना काळात २०२० मध्ये एन्व्हायर्मेंट लाईफ फाउडेशनचे धर्मेश बराई नेरूळमधील टी एस चाणक्यच्या किनाऱ्यावर भटकंतीसाठी गेले असताना तेथील कचरा पाहून व्यथित झाले. स्वत:सह एकूण तीन सहकाऱ्यांनी रविवारी या परिसरात पहिले स्वच्छता अभियान राबविले. या अभियानाची माहिती समाज माध्यमांवर टाकण्यात आली. यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते ९ असे दोन तास खाडीकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी योगदान देण्याचा निश्चय केला. तेव्हापासून सलग चार वर्षे हे अभियान सुरूच आहे.

या रविवारी सारसोळे जेट्टी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा हा २०० वा आठवडा होता. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील विविध खाडीकिनारी हे अभियान नियमित राबविले जात आहे. एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनच्या मँग्रोव्हज सोल्जर विभागाच्या माध्यमातून हे अभियान आता राबविले जाते. मँग्रोव्हज फाउंडेशन व नवी मुंबई महानगरपालिकेचेही त्यासाठी योगदान लाभत आहे. शहरातील विविध पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थीही खाडीकिनारा स्वच्छ करण्याच्या अभियानात सहभागी होत आहेत. नवी मुंबईसोबत मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यामध्येही ही चळवळ पसरली आहे.२०० मोहिमेत यांचा सहभाग

सारसोळे जेट्टी परिसरातील २०० व्या अभियानामध्ये वनशक्ती, बीच प्लीज, स्वच्छ वसुंधरा अभियान व मँग्रोव्हज सोल्जरचे स्वयंसेवक व महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, नेरूळचे विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, दिनेश वाघुळदे, एन्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेश बराई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० मी मोहीम पार पडली.चार वर्षांमध्ये सलग २०० आठवडे हे अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत चप्पल, थर्माकाॅल, मेडिकल वेस्ट, सौंदर्य प्रसाधनाचा कचरा, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पेन, लायटर्स अशा एकूण ६०० टन कचरा संकलित केला आहे. प्रत्येक मोहिमेमध्ये ५० ते २ हजार नागरिक सहभागी होतात. आतापर्यंत ६० हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. धर्मेश बराई, संस्थापक एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई