शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अलिबागमधील २० महिलांनी अनुभवली आनंदवारी

By admin | Updated: June 23, 2017 06:02 IST

मुखात विठुरायाचे नाम आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर, पायाला पंढरीच्या ओढीची भिंगरी, अशा रूपात विठ्ठलमय झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मुखात विठुरायाचे नाम आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर, पायाला पंढरीच्या ओढीची भिंगरी, अशा रूपात विठ्ठलमय झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते. कोणी हरिपाठाचे वाचन करत होते, तर कोणी फुगडी खेळत, टाळ, मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन होऊन पुढे जात होते. नाही भुकेची आस, नाही घशाला कोरड अशा अवस्थेत पुणे ते सासवड रस्ता भक्तिमय रंगात एक होऊन रंगून गेला होता आणि याच वारीत अलिबागमधील २० भगिनी सहभागी झाल्या होत्या.पुणे ते सासवड अंतर ३२ किमी आणि पुढे माउलीचे मुक्काम ठिकाण १० किमी असे ४२ किमी अंतर आहे. पालखी काळातला सर्वात मोठा टप्पा तेही दिवसभर चालून सासवड मुक्कामी पोहचायचे अशा हेतूने कितीतरी दिंड्या निघाल्या होत्या. आम्ही पण मागील वर्षी आळंदी ते पुणे एक टप्पा पूर्ण करून, या दुसऱ्या टप्प्यात यंदा वानवडी-हडपसरमार्गे सकाळी साडेआठला चालायला सुरुवात केल्याचे या वारीत सहभागी कवयित्री अनिता जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिकडेतिकडे माउलींच्या नामाचा जयघोष करीत निघालेले वारकरी आणि असंख्य भाविक दिसत होते. काही वेळानंतर आम्हाला पालखीचे दर्शन झाले. पालखीपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली होती. आम्ही २० जणी पालखीमागोमाग निघालो. माउलीच चालण्याचे बळ देत होती, असे जोशी यांनी पुढे सांगितले.दिवे घाटातून वारकरी जाताना मुंग्यांप्रमाणे दिसत होते, म्हणूनच बहुदा या घाटाला मुंगी घाट म्हणत असावेत. रस्त्याबरोबरच डोंगरही माणसांनी फुलून गेला होता. पालखी विश्रांतीसाठी थांबली असता माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवल्याचे भावना जोशी यांनी सांगितले. वारीचा दुसऱ्या वर्षीचा टप्पा यशस्वी पार पडला. कवयित्री अनिता जोशी यांच्या समवेतच्या माधुरी जोशी, शुभांगी नाखे, उमा देशमुख, विद्या महाडेश्वर, राजश्री थळे, भारती वझे, स्मिता जोशी, स्मिता गोडबोले, वर्षा कुलकर्णी, स्वाती पित्रे, अ‍ॅड.स्वाती कुलकर्णी ,विदुला दातार, चित्रा लोंढे, कांचन पाटील, योगिता गवळे, मुग्धा मांजरेकर,अंजू दामले, प्रज्ञा जैन, राधिका खवासखान, नेहा रानडे, दीपा संत, रश्मी देव आणि ऋता मुळ्ये या सर्व २० भगिनी वारीत सहभागी झाल्या होत्या.