शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीमध्ये २० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:48 IST

पामबीच मार्गावर घणसोलीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा व कार हस्तगत केली असून तीनही आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रहिवासी आहेत.

नवी मुंबई : पामबीच मार्गावर घणसोलीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा व कार हस्तगत केली असून तीनही आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रहिवासी आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये इफ्तिकार मोहमद इब्राहिम अहमद, वसीम हकिम खान व रफिक सईद खान यांचा समावेश आहे. मालेगावमधील रहिवासी असलेले हे आरोपी गांजा विक्रीसाठी नवी मुुंबईमध्ये येणार असल्याची माहिती रबाळे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांच्या पथकाने १२ जूनला रात्री साडेअकरा वाजता सापळा रचला होता. एमएच ०६ एएफ १४०० या इंंडिका कारमधून आलेले तीन जण या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इफ्तिकार अहमद मोहंमद इब्राहिम अन्सारी याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६ किलो गांजा, ४०० रूपये रोख रक्कम, सॅमसंग मोबाइल व वाहन चालकाचा परवाना सापडला आहे. दुसरा आरोपी वसीम हकीम खान याच्याकडून ८ किलो गांजा, ५७० रूपये रोख रक्कम व मोबाइल फोन जप्त केला आहे. रफिक सईद खान याच्या ताब्यातून ६ किलो गांजा, मोबाइल फोन जप्त केला आहे. तीनही आरोपींकडे एकूण २० किलो गांजा सापडला आहे.अटक केलेल्या आरोपींविरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पहिल्यांदा गांजा तस्करीमध्ये नाशिकमधून आलेले आरोपी सापडले आहेत. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक