शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
3
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
4
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
5
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
6
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
8
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
9
सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
10
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
11
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
12
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
14
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
15
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
16
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
17
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
18
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी
19
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम
20
संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली

नरेगाच्या कामांवर २,९१७ मजूर

By admin | Updated: October 1, 2015 01:43 IST

पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत

ठाणे: पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत. त्यासाठी घेतलेल्या ११० कामांवर दोन हजार ९१७ मजूर काम करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला आहे. उत्पादन अत्यल्प होणार असल्यामुळे शेतकरी त्यावर अधिक खर्च करण्यास धजावत नाही. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे ते ग्रामपंचायतींसह विविध शासकीय विभागाद्वारे नरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांवर जात आहेत. एप्रिलपासून या कामांवरील मजुरीतही वाढ झाली आहे. या आधी केवळ १६५ रूपये मिळत असत. परंतु, आता १८१ रूपये प्रतिदिन अशी मजुरी मिळत आहे. त्यामुळे या कामांवर मजूर वळताना दिसत आहेत.या कामांवर हजर राहणाऱ्या मजुरांचे वेतन १५ दिवसाच्या आत त्यांच्या बँकेसह पोस्टातील खात्यावर जमा होत असल्याचा दावाही केला जात आहे. संबंधितानाकडून काही वेळा चुकीचा खातेक्रमांक टाकल्या जात असल्याची समस्या निदर्शनात आलेल्या आहेत. यामुळे दुसऱ्याच्या खात्यावर मजुरी जमा होत असल्याचे तक्रारी अधूनमधून येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन सदरची मजुरी पुन्हा संबंधित मजुराच्या खात्यावर वळविली जाते. या प्रक्रियेला मात्र काही दिवसांचा विलंब होतो.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींद्वारे ६२ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर एक हजार ५८२ मजूर कार्यरत आहेत. याशिवाय विविध यंत्रणाव्दारे ४८ कामे सुरू केलेली आहेत. त्यावर एक हजार ३३५ मजूर कार्यरत आहेत. यापैकी भिवंडी तालुक्यातील २० कामांवर ३०० मजूर आहेत, शहापूर ३८ कामे ११२८ मजूर असून कल्याणमध्ये सात कामांवर १११,अंबरनाथच्या सात कामांवर १६८, मुरबाडच्या ३८ कामांवर सर्वाधिक एक हजार २१० मजूर कार्यरत आहेत.