शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

महापालिका कर्मचा-यांना १९ हजार सानुग्रह अनुदान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:52 IST

महापालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाºयांना दिवाळीसाठी १९ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना १२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेमध्ये कायम कर्मचा-यांसाठी दोन हजार व कंत्राटीसाठी अडीच हजार रुपयांची विक्रमी वाढ केली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाºयांना दिवाळीसाठी १९ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना १२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेमध्ये कायम कर्मचा-यांसाठी दोन हजार व कंत्राटीसाठी अडीच हजार रुपयांची विक्रमी वाढ केली आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये जाणार असून तेथे किती वाढ होणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.बोनस अ‍ॅक्टनुसार महापालिकेचे कर्मचारी बोनस मिळविण्यास पात्र नाहीत. कर्मचाºयांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी त्यांना प्रत्येक वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येते. यावर्षीही दिवाळीपूर्वीच ही रक्कम कर्मचाºयांना मिळावी या उद्देशाने स्थायी समितीमध्ये प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. पालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाºयांना १७ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना ९५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे असे सुचविण्यात आले होते. महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये ७ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद केली असून त्यामधून हे पैसे देण्यात येणार आहेत. शिवसेनेचे नामदेव भगत यांनी कायम व कंत्राटी कामगार सर्वांना समान बोनस देण्यात यावा, अशी मागणी केली.कंत्राटी कामगार कायम कर्मचाºयांएवढेच किंबहुना जास्तच काम करतात. त्यांना सानुग्रह अनुदान कमी देणे योग्य होणार नसल्याची भूमिका मांडली. सर्वांना २० हजार रुपये रक्कम देण्याचा आग्रह त्यांनी धरला. राष्ट्रवादी काँगे्रसचे अशोक गुरखे यांनीही प्रशासनाने सूचित केलेल्या रकमेमध्ये वाढ करण्याचा आग्रह धरला.विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा आग्रह धरला. कर्मचाºयांमध्ये पक्षपात करू नये. दिवाळी आनंदामध्ये साजरी करता आली पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान वाढवून द्या, अन्यथा विषय मतासाठी टाका अशी भूमिका मांडून सत्ताधाºयांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.सानुग्रह अनुदानाची रक्कम कंत्राटी कामगारांच्या थेट बँक खात्यात जमा करावी असे सुचविले. देविदास हांडे पाटील व इतर नगरसेवकांनीही कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान वाढवून देण्याची मागणी केली. अखेर सभापती शुभांगीताई पाटील यांनी कायम कर्मचा-यांसाठी १९ हजार रुपये व कंत्राटी कामगारांसाठी १२ हजार रुपये देण्याची सूचना केली व सूचनांसह प्रस्ताव मंजूर केला.२५ हजारांचे पाकीटसानुग्रह अनुदानावर चर्चा करताना नगरसेवक नामदेव भगत यांनी यापूर्वी काही जणांना २५ हजार रूपयांचे पाकीट मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही जणांना मिळत असलेले पाकीट मिळणे बंद झाले असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले व कसले पाकीट याची स्पष्ट कल्पना दिली नसली तरी पालिकेच्या वर्तुळामध्ये २५ हजार रूपये कोणाला व कशासाठी दिले जात होते, याची चर्चा होती.राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्नशिवसेना सदस्यांनी २० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा आग्रह धरला. विजय चौगुले व नामदेव भगत यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीची कोंडी केली. तुमच्या नेत्याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कर्मचाºयांना चांगल्या सानुग्रह अनुदानाची घोषणा करा. वाटल्यास बाहेर जावून नेत्यांना फोन करा अशा कोपरखळ्याही मारल्या. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सत्ताधाºयांनीही कायम व कंत्राटी कामगारांच्या रकमेमध्ये अनुक्रमे दोन व अडीच रूपये वाढ केली.