शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनमधील १९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती; प्रलंबित प्रश्न सुटल्याने आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 06:40 IST

अग्निशमन विभाग सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पावले उचलली आहेत. अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे.

नवी मुंबई : अग्निशमन विभाग सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पावले उचलली आहेत. अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे. २६० अधिकारी व कर्मचाºयांची भरती सुरू केली असून १९ अधिकारी व कर्मचाºयांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रलंबित तीन प्रश्न सुटल्यामुळे अग्निशमन जवानांनी आनंद व्यक्त केला आहे.अग्निशमन दलात अनेक वर्षे कार्यरत असणाºया अनुभवी अधिकारी, कर्मचारीवृंदाला त्यांच्या श्रेणी व अनुभवानुसार पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता व चालक यंत्रचालक (ड्रायव्हर आॅपरेटर) या संवर्गात १९ जणांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीने संपूर्ण छाननी करून पदोन्नती सूचित केली असून या अनुषंगाने सध्या सहा. केंद्र अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या जगदीश तुकाराम पाटील यांना अग्निशमन केंद्र अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. अग्निशामक पदावर सद्यस्थितीत कार्यरत पदाजी निरगुडे, विनोद देठे, रमेश कोकाटे, नितीन कांबळे, किशोर कोंडाळकर, पांडुरंग हंबरे, कैलास वाघचौरे, दशरथ कांबळे, सुधाकर पाटील, अजय पांचाळ, संतोष कोळी, चंद्रकांत घाडगे, शैलेश जगताप, किरण आतकरी, नवनाथ गरु ड या १५ कर्मचाºयांना अग्निशमन प्रणेता संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. रमेश जाधव, दत्ता पाटोळे, रामेश्वर पवार यांना वाहनचालक (अग्निशमन) पदावर सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना चालक यंत्रचालक ड्रायव्हर आॅपरेटर या संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या सेवाविषयक बाबींकडेही बारीक लक्ष असून या पदोन्नतीमुळे मनोबल वाढेल, अशी प्रतिक्रिया अग्निशमन कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई